सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव:- कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अशोकराव रोहमारे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-

(सुरेगाव):- शालेय शिक्षणातील प्राथमिक शिक्षण हा टप्पा महत्त्वाचा असून याच बालवयातील मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक
कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी केले.


कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेले गोदावरी विकास प्रतिष्ठान संचलित फार्मर्स डेन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे ,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे ,गौतम सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर दंडवते, गोदावरी दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव ,गोदावरी ग्रामीण पतसंस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव दंडवते, गोदावरी विकास सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब चांदगुडे, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे ,सेवानिवृत्त तहसीलदार सानप ,गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, माजी सरपंच निळकंठ चांदगुडे, गोदावरी विकास प्रतिष्ठानचे सचिव रविराज चांदगुडे, संचालक युवराज चांदगुडे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्या अर्चना बोरावके यांनी शाळेच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांचे सादरीकरण केले यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अदाकारी ने उपस्थित मान्यवरांचे मते जिंकली चिमुकल्यांच्या सादरीकरणात उपस्थितांनी कौतुक केले पुढे बोलताना रोहमारे म्हणाले ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावं याकरता पंडितराव चांदगुडे ,यांनी अथक प्रयत्नातून उभ्या केलेल्या पब्लिक स्कूलचे काम उल्लेखनीय असल्याचे गौरोवोद्गार रोहमारे यांनी केले स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारती अशोक भारती, अगस्ती आहिरे ,प्रियंका गाडे ,अश्विनी कोल्हे, सुभाष वाणी, सोनाली शिंदे, सोनाली देवरे, वैशाली वाणी, मनीषा वाणी, गणेश निरभवणे,रवींद्र भोसले, आदींनी प्रयत्न केले सूत्रसंचालन सोनाली शिंदे, सोनाली देवरे यांनी केले तर आभार संस्थेच्या संचालिका माधुरी चांदगुडे यांनी मानले

चौकट:-
डेन पब्लिक स्कूल ग्रामीण भागात असले तरीही शाळेचे शिक्षक व शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार असलेल्यानेच अल्प कालावधीत मध्ये पब्लिक स्कूलने नावलौकिक केले असल्याचे गौरोवोद्गार शेख यांनी केले
शबाना शेख,गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *