
कोपरगाव प्रतिनिधी:-
सध्या करोना महामारी ने अक्राळविक्राळ रूप धारण केलेले आहे .covid-19 ला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर , मास्कचा वापर ,वारंवार हात धुणे त्याचबरोबर रुग्णांसाठी वाफ घेणे हेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयाला 25 वेपो रायझर चे वाटप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी केले. याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे, आपत्ती व्यवस्थापनाचे समन्वयक सुशांत घोडके तसेच अतुल कोताडे ,आगरकर ताई , सुनिता ससाणे उपस्थित होते.
