शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील:- कृषिमंत्री ना. श्री. माणिकराव कोकाटे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महाबळेश्वर येथील विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरू आहे. याचबरोबर आता स्ट्रॉबेरी संशोधनास देखील मान्यता मिळाली असून त्याचे देखील काम सुरू आहे. लवकरात लवकर येथील केंद्र अद्ययावत करून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री ना.श्री माणिकराव कोकाटे यांनी केले.


महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र, महाबळेश्वर येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या अतिथीगृहाचे भूमिपूजन कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरीचे प्रति कुलपती ना. माणिकराव कोकाटे यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष श्री.तुषार पवार, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम, गहू रोग शास्त्रज्ञ डॉ. मनीष सुशीर, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. विक्रांत साळी, जिल्हा कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे तसेच कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथील अधिकारी कर्मचाऱ्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना. माणिकराव कोकाटे यांनी सध्याच्या जुन्या अतिथिगृहाची पाहणी केली. त्यानंतर नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीची जागा व आराखड्याचे अवलोकन केले तसेच बारकावे समजून घेत उपस्थित अभियंत्यांना काही बदल कारण्यासह महाबळेश्वर पर्यटन स्थळास शोभेल असे दर्जेदार काम करण्याबाबत सूचना दिल्या.
याप्रसंगी डॉ. दर्शन कदम अधिक माहिती देताना म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे अतिथीगृह महाराष्ट्र तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ,आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधारणा केंद्र, (CIMMYT) मेक्सिको येथील गहू तांबेरा शास्त्रज्ञ रोगावर आणि स्ट्राॅबेेरी वर काम करणारे शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यासाठी उपयोगी येणार आहे. यावेळी गहू गेरवा संशोधन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *