वारी गावात ‘मोफत पाणपोई’ ची सुरुवातमहिलांनी केले उद्घाटन टेके पाटील ट्रस्टचा पुढाकार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :-!तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता वाटसरुंसाठी शिवजयंतीच्या दिवशी रेल्वे गेट परिसरात ‘मोफत पाणपोई’ सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचे उद्घाटन प्रभाग क्रमांक चार येथील महिलांच्या हस्ते पूजन व फीत कापून करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचा उपस्थितांमध्ये पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
सध्या सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वारीतून वैजापूर व शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची, प्रवाशांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा येथील साई पालखी देखील याच रस्त्याने जातात. याच परिसरात कान्हेगाव रेल्वे स्थानकाचे रेल्वे फाटक आहे. सध्या ऊस तोडणी मजूर, परप्रांतीय शेतमजूर यांची देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचबरोबर याच परिसरात शाळा असून सध्या दहावीचे पेपर सुरू झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्याची गरज लक्षात घेता सामाजिक भावनेतून ट्रस्टच्या वतीने ही मोफत पाणपोई सुरू करण्यात आली आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.
या पाणपोईमध्ये सामाजिक भावनेतून व श्रमदानातून डोक्यावर हंडा घेत पाणी टाकण्याची जबाबदारी ही उद्घाटन केलेल्या प्रभाग क्रमांक चार मधील राहुल (दादा) मित्रमंडळाच्या महिला स्वयंसेवकांनी घेतली असल्याने ही विशेष बाब आहे. ट्रस्टच्या मार्फत गेली चार वर्ष वारी गावासह परिसरात असंख्य सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यातीलच हा एक उपक्रम उन्हाळ्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आला आहे. निश्चितच या उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे ही पाणपोई सीसीटीव्हीच्या निगराणी खाली असणार आहे. या उद्घाटनाप्रसंगी राहुल (दादा) मित्र मंडळाचे सर्व स्वयंसेवक, सर्व महिला स्वयंसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *