राष्ट्रीय थांग ता मार्शल आर्ट्स कराटे स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु. श्रावणी गाडे हिला कांस्यपदक….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय थांग ता स्पर्धेत घवघवीतयश संपादन करून मध्यप्रदेश येथून ग्वाल्हेर येथे झालेल्या तिसाव्या राष्ट्रीय ज्युनिअर थांग ता मार्शल आर्ट चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी गाडे हिला कास्य पदक प्राप्त झाले अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी आर सोनवणे यांनी येथे दिली.
वर्धा येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील सुमारे 400 स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला .या स्पर्धेत आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी गाडे हिने कास्यपदक पटकावले. कु. श्रावणी संजय कुमार गाडे हिने महाराष्ट्र राज्याच्या संघातून कास्यपदक पटकावून महाविद्यालयाचा अभिमान वाढविला आहे. श्रावणीच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल खूप खूप अभिनंदन. तिच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव संजीव दादा कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. सी. ठाणगे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, क्रीडा शिक्षक श्री. एम. व्ही. कांबळे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *