निराधार आजी व तीचा अपंग मुलगा यांना मिळाला साईआश्रय:- गणेश दळवी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
राहता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे या गावात एक 40 वर्षीय महिला नाव ललिता बाबासाहेब पाडेकर ही स्वतः कष्ट करून तिची वयोवृद्ध आई गोदावरी रामचंद्र पवार वय वर्ष 75 तसेच अपंग भाऊ राजु रामचंद्र पवार वय वर्ष 45 यांचा सांभाळ करत होत्या सर्व कुटुंबाची पालनपोषणाची जबाबदारी या महिलेवर होती परंतु काळाने आघात केला व एक 1 महिन्यापूर्वी चुली साठी लागणारे सरपन घेण्यासाठी ही महिला पडून असलेल्या इलेक्ट्रिक केबल चा बंडल हा बरेच दिवसांपासून पडलेला होता याठिकाणी सरपण घेणे कामी गेली असता ती सर्व केबल या महिलेच्या अंगावर पडली दुर्दैवी या महिलेचा अपघाती मृत्यू त्या ठिकाणीच झाला व तिची आई व तिचा अपंग भाऊ अनाथ निराधार झाले अशा वेळी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक माननीय दीपक गंधाले साहेब व पोलीस अविनाश मकासारे साहेब पुण्यनगरीचे पत्रकार किशोर पाटणी साहेब यांनी पुढाकार घेतला व

साईआश्रयात दाखल करणे कामी माझ्याशी चर्चा केली तेंव्हा हे दोघेही अनाथ व निराधार आहेत यांना साईआश्रय हा मिळालाच पाहिजे या हेतूने आम्ही दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला यानंतर कायदेशीर पूर्तता करून आजीला व तिच्या मुलाला साईबाबांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या सबका मालिक एक प्रतिष्ठान संचलित साईआश्रया परिवारात साईआश्रय देण्यात आला यानंतर दोघांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली मुलाला काही वर्षांपूर्वी पॅरलेस चा अटॅक आलेला असल्याने तसेच खूप प्रमाणात खोकला येत असल्याने साईबाबा हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ट्रीटमेंट या दोघांनाही सुरू आहे व याठिकाणी आनंदाने साईआश्रय घेत आहेत


…ओम साई राम…
साई सेवक:- गणेश दळवी
Mo :- 9637549300…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *