कमी वयात विश्वासपात्र होवून बांधकाम क्षेत्रात आजपर्यंत यशस्वी कारकीर्द घडविणारे आमचे प्रसादभाऊ आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:- भरतजी मोरे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
अनेक अडचणीत, संकटात खरंतर देवाकडे आपण धाव घेतो,पण साक्षात कधी देव मदतीला धावून आला असे कधीच मला दिसले नाही,. कदाचित मानव देहाच्या रूपी देव मदतीला धावून येतात हे आमचे मित्र प्रसाद भाऊ नाईक यांच्या रूपाने माझ्यासारख्या अनेकांनी अनुभवले आहे,.
साध्या भेटीला सुध्दा प्रसाद भाऊ मन ओळखून प्रोत्साहित करत असतात, हजरजबाबीपणा विनोदबुद्धी आणि सहजपणे अनोळख्या हा चांगलाच ओळखीचा होवून जातो हे माणूसपणाचे प्रमुख लक्षण प्रसाद भाऊंच्या वागण्यात दिसतच असते,. विचार, कृती आणि बोलणे यात प्रसाद भाऊंचा मेळ असल्याने कमी वयात विश्वासपात्र होवून बांधकाम क्षेत्रात आजपर्यंत यशस्वी कारकीर्द घडविलेली आहे,.मला तर अनेक अडचणीत संकटात संकटमोचक होवून माझे आधारवड प्रसाद भाऊ झाले आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो,.
मित्र प्रसाद भाऊ मी अजून कितीही शब्दांत व्यक्त होणे ठरवले तर ते शक्य होणार नाही, कारण तुमच्या जगण्याचे अनेक पैलू आहेत जे समाजसेवा करण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी तुम्ही नानाविध कारणांनी सज्ज असतात,अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रचंड गोष्टी कोपरगाव करांनी बघितल्या आहे अनुभवल्या आहेत,..
प्रसाद भाऊ आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक भगव्या उदंड आणि निरोगी आयुष्याच्या मनःपुर्वक शुभेच्छा,…

शुभेच्छुक,.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे युवामंच
हत्ती गणपती
माजी नगरसेविका सौ सपना भरत मोरे प्रभाग क्रमांक ३
शिवसेना युवासेना विधानसभा मतदारसंघ कोपरगाव
भ.मो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *