
कोपरगाव प्रतिनीधी:-
ओबीसी व बारा बलुतेदारांचे नेते तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री. कल्याणराव दळे साहेब यांच्या पत्नी कै.सौ.अरुणाताई ह्या एक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.जेव्हा घरातील एखादी व्यक्ती सामाजिक कार्य करते तेव्हा तीला सांभाळून घेणारी व सतत पाठिंबा देणारी आणि कुटूंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी घरातील व्यक्ती सुद्धा महत्त्वाची असते. तसेच कार्य अरुणा ताईंनी केले. सर्वाना प्रेमाने आणि हक्काने नाते लावणारी ताई आज आपल्यातून अचानक निघून गेल्यात. “जो आवडे सर्वाना तोची आवडे देवाला” या प्रमाणे घडले.
अशा अरुणा ताईंच्या आत्म्यास चिरशांती लाभो व परमेश्वर दळे परिवाराला दुःख सांभाळण्याची शक्ती देवो हिच संत सेनाजी महाराज चरणी प्रार्थना…
शोकाकुल:- साप्ताहिक साईंची गाथा, साप्ताहिक साई संजिवनी विद्या ,व SG news संपादक संतोष भिमराज जाधव यांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली…
