
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव तालुका विविध क्षेत्रातील समाजसेवकांची खाण आहे हा परिसर संपूर्ण देशाला सर्व दिशांना मध्यवर्ती असून हा परिसर दुष्काळी असला तरी विविध धार्मिक तिर्थक्षेत्र, औद्योगिक करणाने वेढला आहे. प्रभु रामचंद्रांच्या कर्मभूमीत मराठवाड्यातील अंबेजोगाई येथील शैक्षणिक,वैद्यकीय क्षेत्रातील सर्व शैक्षणिक कसोट्यातून अव्वल स्थान पटकाविणाऱ्या डॉ.दत्तात्रय शामराव मुळें(MD.and ECHO cardiografy* ) यांनी आपले उज्ज्वल भविष्यासाठी कोपरगांव तालुक्यात ग्रामीण भागातील पहिल्या क्रिटिकल रुग्णालयाची यशस्वी मुहूर्तमेढ रोवली. हृदयरोग,हार्टॲटक,पॅरालेसिस , शॉकसह सर्व प्रकारच्या विषबाधा आदी गुंतागुंतीच्या प्राणघातक आजाराने शेवटच्या घटका मोजणाऱ्या 76000 वरील रुग्णांच्या आजाराचे जलद निदान करून तातडीने त्यांचेवर उपचार करून अवघड परिस्थितीत न डगमगता मृत्यूच्या दाढेतून सहिसलामत वाचविण्यात डॉ मुळेंचा हात कोणी धरु शकले नाही हे कोणीच नाकारू शकत नाही.
कोपरगाव पंचक्रोशीत सर्पदंश यावर डॉ.मुळे स्पेशालिस्ट आहे. आसपासच्या पाच-सहा तालुक्यात असंख्य शेतकरी व सामान्य नागरिक रात्री बे रात्री सर्पदंश झाल्यावर धावत धावत डॉक्टरांकडे येतात. डॉक्टर कधी आळस न करता त्यावर उपचार करतात आतापर्यंत ९० टक्के रुग्णांचे जीव त्यांनी वाचवले आहे हा त्यातला त्यात एक विक्रम आहे.
तीन वर्षातील कोरोना महामारी दहशतीखाली संपूर्ण जग स्वतः एकट्याला घरात मृत्यूच्या धास्तीने कोंडून घेत असतांनाच डॉ. मुळे यांनी जगात सर्वत्र सर्व आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नाखूष असतांनाच 700 स्वतः रुग्णावर त्यांच्या शरीरास स्पर्शून वैद्यकीय उपचार करून सुखरूप आपले जीवन जगण्यासाठी घरी पाठवले आहे.
गत चाळीस वर्षात आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा लाभ सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी कोपरगांव ,येवला, साई संस्थान रुग्णालय, प्रवरानगर रुग्णालय, भारतीय जीवन विमा ,संजीवनी व गौतम सहकारी उद्योग समूहाचे मदतीने परिश्रम घेतले.
डॉ.दत्तात्रय मुळे यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत वैद्यकीय सेवेत मग्न असताना त्यांनी आपली संगीत आराधना उत्तम रितीने सांभाळली. *आपल्या सुमधुर संगीत गायन प्रसंगी प्रेक्षक आपले भान हरपून उत्तम ठेका धरीत त्यांना उत्तम साथ देवून त्यांच्या संगीत कलेचे चीज करते यावरुन ते किती शागिर्द यांची चुणूक आपणास जाणवते *डॉ. मुळे यांनी रोटरी क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन,आय.पी .आय. ,आर.एस.एस.डी. आय(नवी दिल्ली ) महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय वैद्यकीय, समाज सेवा परिषदेतील सहभाग, प्लॅस्टिक सर्जरी शिबीर, मधुमेह उपचार शिबीर, राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन मोहीम, कॉर्डिओलॉजी उपचार शिबीर, जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर , सर्व सामान्य जनतेला आरोग्य सुविधा मार्गदर्शन, आदी आपल्या अनेक सामाजिक, स़ंघटनात्मक अभिनंदनीय यशस्वी उपक्रमांचा ठसा उमटवला. त्यांचा हा अमूल्य ठेवा त्यांचे सुपुत्र डॉ. संकेत व सूष्ना सौ.प्राजक्ता संकेत मुळे, डॉ .शिरीष व डॉ.सौ. प्रियंका शिरीष मुळे तेवढ्याच ताकदीने जोपासून जनसेवा करीत आहे.

याच बरोबर “नासिक येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ” डॉक्टर मनोजजी चोपडा यांना हा जीवन गौरव पुरस्कार दिला जात आहे.उभ्या महाराष्ट्रात हजारो हृदय शस्त्रक्रिया यशस्वी करून नावलौकिक मिळवलेला आहे. डॉ.मनोजजी चोपडा यांच्या ह्या पुरस्कारामुळे पुरस्काराचे महत्त्वच वाढले आहे.
डॉ.मनोजजी चोपडा यांनी आपले मेडिकल शिक्षण बी.जे मेडिकल, व पुढील शिक्षण ग्रँड मेडिकल येथे पूर्ण केले. जर्मन व न्यूयॉर्क येथे त्यांनी फेलोशिप मिळवली.जग प्रसिद्ध ( साईबाबा संस्थान हॉस्पिटल शिर्डी व वाकर्ड हॉस्पिटल )येथे मुख्य कार्डिओलॉजीस्ट म्हणून सेवा केली.
अत्यंत मानाचा समजला जाणारा “सरदार वल्लभभाई पटेल जीवन गौरव पुरस्कार” त्यांना नुकताच मिळाला आहे. अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत
70 हजार पेक्षा जास्त हृदय विकार उपचार त्यांनी केले आहे अनेक संस्थांमध्ये त्याचे केलेले रिसर्च प्रसिद्ध आहे.
त्यांनी विपुल लेखन केले आहे अनेक पुस्तके,वर्तमानपत्र व वेबसाईट मध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध आहे.
नुकतेच “हृदयरोग व आपण” हे पुस्तक गाजले आहे सुमारे 50 हजार प्रति आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहे. माझे मेहुणे डॉ मुकेशजी अग्रवाल (नाशिक) यांचे डॉक्टर मनोज जी चोपडा यांच्याशी प्रेमाचे व सलोख्याचे संबंध आहे असे मला आवर्जून म्हणवास वाटत.
अशा या महान विभूती ना कोपरगावकरांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार दिला जात आहे. हे नाशिक व अहमदनगर भागात लोकांची मानाची व आनंदाची गोष्ट आहे !
त्याचबरोबर डॉ.विलास आचारी यांनाही जीवनगौरव पुरस्कार मिळत आहे.
गेले 40 वर्ष कोपरगावकरांची त्यांनी अल्प किमतीत सेवा केली आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब समाजसेवेत मग्न असतात. त्यांच्या सुनबाई सौ.डॉ.दिपाली आचारी या प्रसिद्ध टीव्ही स्टार आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने इंडोर गेम हॉल येथे गरीब लोकांकरीता चालविण्यात येणाऱ्या दवाखान्याची मूर्तमेढ रोवली आहे !
डॉ.विलास आचारी य त्यांचे सहकारी व स्वतःडॉक्टर आजही निरंतर सेवा देत आहे आत्तापर्यंत ४० हजार महिलांच्या डिलिव्हरी त्यांनी केल्या आहे. असंख्य रुग्णांचे आशीर्वाद त्यांना मिळाले आहे अशा या डॉक्टरांना सुद्धा कोपरगावकरांच्या वतीने “जीवन गौरव पुरस्कार” दिला जात आहे. तिन्ही डॉक्टरांचे मी माझ्या परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो व पुढील कार्यास शुभेच्छा देतो.
अशा कोपरगांव शहरातील त्रिवेणी संगम साधणाऱ्या मान्यवर हृदय रोग तज्ञ डॉ.दत्तात्रय मुळे, डॉ.मनोजजी चोपडा नाशिक, डॉ.विलासजी आचारी यांचा यथोचित सन्मान कोपरगांव येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.
डॉ.मुळे हॉस्पिटल बस स्टॅन्ड येथे करण्यात येणार आहे. याप्रसंगी आमदार श्री.आशुतोषदादा काळे, व श्री.विवेक भैय्या कोल्हे, तसेच श्री.राजेश आबा परजणे त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.पुनच्छ एकदा सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा !
— जेष्ठ व्यापारी नारायणशेठ अग्रवाल,कोपरगांव
मो 9822630330
शुभेच्छुक- श्री.कांतीलालजी मनोज कुमार अग्रवाल, नंदकिशोरजी अग्रवाल, (पुणे)
श्री.योगेश जोबनपुत्रा, व श्री.जितेंद्र गंगवाल.
