ज्योती सहकारी पतसंस्थेच्यावतीने सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व यु पी आय. क्यू आर कोडचे प्रकाशन वितरण समारंभ संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :-येथील ज्योती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व यु पी आय. क्यू आर कोडचे प्रकाशन वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता तेव्हा सहकार निबंधक ठोंबळ साहेब, विमा कंपनीचे दिपक काळे साहेब, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक एड. रविंद्र ( रविकाका ) बोरावके यांनी केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक संदिप कोळी म्हणाले की,” आजकाल सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढले आहेत,
बहुतांश लोक मोबाईलमध्ये नको ते लोड करीत आहेत परिणामी आर्थिक नुकसान होत आहे म्हणून मोबाईलचा वापर फक्त संदेश दळणवळणासाठी केला पाहिजे. आपला ओ पी कोणालाही देऊ नये. ईतर अवांतर फाईल डाऊनलोड करु नये , प्रत्येकाने
काळजीपूर्वक मोबाईल वापरला तर आर्थिक फटका बसणार नाही. “
सर्व उपस्थित मान्यवरांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संचालक मच्छिंद्र पदाडे यांनी आभार मानले संचालक प्रभाकर पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले समारंभासाठी सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *