
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनालय सेवा संचालनालय आणि एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे दिनांक 8 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय वुशु क्रीडा स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात दिनांक 3 डिसेंबर पासून 7 डिसेंबर 2024 या कालावधीत झाली असून सदर क्रीडा स्पर्धेच्या प्रशिक्षण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आली. या प्रसंगी वुशू या क्रीडा प्रकाराचे संघ व्यवस्थापक श्री. दीपक धनवटे श्री धर्मनाथ घोरपडे संगम मार्गदर्शक सागर मोहिते संघ मार्ग दर्शिका कुमारी तेजस्विनी पाटील उपस्थित होत्या. सदर क्रीडा प्रशिक्षण सराव यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता जिमखाना विभागाचे डॉ. विशाल पवार व प्राध्यापक सुनील कदम यांनी परिश्रम घेतले.
