

उमेदवारांना आचारसंहिता व खर्चाबाबतच्या नोंदीविषयी मार्गदर्शन…
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक (भा.प्र.से) हौलनलाल गौईटे यांनी केले.
संगमनेर येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील सभागृहात अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप, आदर्श आचारसंहिता व खर्चाबाबत मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांना मार्गदर्शन करतांना श्री.गौईटे बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे उपस्थित होते.
श्री.गौईटे म्हणाले की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उमेदवारांनी प्रशासनाला सहकार्य करावे. निवडणूक प्रचार करतांना कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. विधानसभेची उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना त्यांची दैंनदिन नोंदवही संपूर्ण प्रचार कार्यकाळात खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते
