

न्याय हक्क व समाजातील घटकांच्या विकसनशील मागण्यासाठी मुंबईत दाखल होणार चर्मकार समाज…
कोपरगाव प्रतिनिधी: राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा १/१०/२०२४ मंगळवार रोजी मुंबई येथील आझाद हिंद मैदानावर सकाळी ११ वाजता भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चास बहुसंख्य समाज बांधवांनी व भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री दिलीप कानडे यांनी केले आहे
राष्ट्रीय चर्मकार महासंघ द्वारा समाजाच्या न्याय हक्क व समाजातील घटकांच्या विकसित मागण्यासाठी या भव्य मोर्चाचे आयोजन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री माननीय श्री बबनराव ( नाना )घोलप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या युवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे व युवा प्रदेश अध्यक्ष अमर तांडेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात चर्मकार जनसंवाद तसेच समाज जनजागृती दौरा यशस्वीरित्या पार पडला याचा यावेळी होणाऱ्या या मोर्चाला फार मोठे योगदान असणार असल्याचे चर्मकार समाजात चर्चा आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघ हे पूर्णतः अ – राजकीय सामाजिक संघटन आहे विशेष करून समस्त चर्मकार समाजाला संघटित करून सर्व चर्मकार पोटजाती एका संघटनेच्या छत्राखाली आणून तसेच विविध छोट्या-मोठ्या संघटना विसर्जित करून माजी समाज कल्याण मंत्री माननीय श्री बबनराव (नाना) घोलप यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २४ सप्टेंबर १९९५ रोजी महाराष्ट्र चर्मकार महासंघाची स्थापना झाली अर्थात पुढे त्याचे रूपांतर राष्ट्रीय पातळीवर पोहोचून राष्ट्रीय चर्मकार महासंघ या नवनिर्माण संघटनेत रुपांतर झाले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष असलेले माजी समाज कल्याण मंत्री बबनराव नाना घोलप यांच्या नावावर त्यावेळी शिक्कमोर्तब करण्यात आला त्यांच्याच अध्यक्षतेखाली मुंबईतील शिवतीर्थावर चर्मकार समाजाचे भव्य मेळाव्याचे आयोजन करून दोन ते तीन लाखांची न भूतो न भविष्य तो अशी समाजबांधवांची उपस्थिती उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री माननीय श्री बबनराव (नाना) घोलप यांनी चर्मकार समाजाकरिता केलेली योगदान अतिशय मोलाचे असून त्यावेळी पाहायला मिळाले चर्मकार समाजातील एकी आता पुन्हा एकदा मुंबईतील आझाद हिंद मैदानावर चर्मकार समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्यास संपूर्ण चर्मकार समाज एकत्रित होणार आहे याकडे मंत्रालयापासून तर जनसामान्य पर्यंत सर्वांचे लक्ष वेधले आहे
सदरच्या मोर्चास संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार बंधू व भगिनी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे यांनी केले आहे
