धारणगाव येथील शबरीनगर धारणगाव येथे नाइकवाडे किराणा स्टोअर्स ते गांगवे यांच्या घरापर्यंत रस्ता दुरुस्त करावा आणि बंदिस्त गटारी कराव्या एकलव्य संघटनेचे ग्रामपंचायतला निवेदन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.०९/०९/२०२४ वार:- सोमवारएकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या आदेशाने व एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव किरणजी ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका कमिटी कोपरगाव त्याच प्रमाणे ग्रामपंचायत सदस्य कु.मोहिनी विठ्ठल मोरे आणि धारणगांवातील शबरीनगर वास्तव्य करणाऱ्या समस्त आदिवासी बांधवांच्या समस्येचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालय धारणगांव यांना देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की,शबरीनगर धारणगाव येथे नाइकवाडे किराणा स्टोअर्स ते गांगवे यांच्या घरापर्यंत रस्ता दुरुस्त करावा आणि बंदिस्त गटारी करण्यात याव्या .यासंदर्भात लवकर कारवाई करावी अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा निवेदनात इशारा देण्यात आला आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *