गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
मोठा दुष्काळ पडतो की काय या विवंचनेत कोपरगावकर असताना शुक्राचार्य महाराजांची कृपा झाली चमत्कार झाला.


पाच दिवसाच्या ह्या मूर्तीच्या सोहळ्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे 22 तारीख गुरुवार संध्याकाळी मूर्ती जागेवर प्रतिष्ठित करण्यात आली व जोरदार पावसाला सुरुवात झाली रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळी खूप पावसाचे वातावरण होते , गर्मत होते पण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत दीड १.३० वाजे पर्यंत पाऊस नव्हता.


प्राणप्रतिष्ठा झाल्या झाल्या फक्त बेट भागातच जोरात पाऊस झाला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईपर्यंत पाऊस थांबला होता. आणि चार-पाच वाजेनंतर जोरदार जोराच्या पावसाची सुरुवात झाली आणि अजून पाऊस पडत आहे.
खऱ्या अर्थाने शेतकरी राजा च्या पिक वाचवण्यासाठी, विहिरींना पाणी उतरेल असा पाऊस शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि खरी कृपा वरून राजाच्या रूपाने महाराजांची कोपरगाव तालुक्यावर झाली. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मंदिर आश्रमाचे मठाधिपती प.पू रमेशगिरीजी महाराज , जंगलीदास आश्रमाचे प.पू. परमानंद गिरीजी महाराज, कुंभारी चे प.पू राघवेश्वरानंद गिरीजी महाराज व अनेक साधुसंताच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्या नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या म्हारसदाचा लाभ पाच हजार हून अधिक भाविकांनी घेतला


खऱ्या अर्थाने शुक्राचार्य महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठित झाली . निश्चितपणे कोपरगाव शहर व तालुक्याचा इथून पुढे सर्वार्थाने भरभराटीकडे , व्यापार वाधीकडे , सुख , शांती समाधान , समृद्धीकडे वाटचाल होणार हे आजच्या पावसाच्या रूपाने उदाहरणाची प्रतीक आहे
यासाठी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व मंदिर समितीचे प्रमुख सचिन परदेशी , उपप्रमुख प्रसाद पऱ्हे सर्व ट्रस्टी, मंदिर समितीचे सर्व सदस्य , व्यवस्थापक व या मूर्ती प्रतिष्ठा सोहळ्याचे प्रमुख पौरोहित्य करणारे वैभव गुरु जोशी व त्यांचे सहकारी गुरु या सर्वांचे मनापासून आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *