कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणेकामी प्रभाग निहाय “कोरोना सुरक्षा समिती” स्थापन करावयाची आहे:- विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात कोरोना विषाणूची दुसरी लाट आलेली असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मृत्युचेही प्रमाण वाढले आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणेकामी प्रभाग निहाय “कोरोना सुरक्षा समिती” स्थापन करावयाची आहे. प्रत्येक प्रभागातील दोन नगरसेवक व त्याच प्रभागातील 4 नागरिक यांची समिती स्थापन होणार आहे. ज्या नागरिकांना स्वतःहून या समितीत काम करायचे आहे त्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली नांवे नगरसेवकांच्या माध्यमातून दि.12/4/2021 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत श्री.सुनील गोर्डे, उपमुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद यांचेकडे द्यावीत.
आपापल्या प्रभागातील कोरोना बाधित रुग्णांची नांवे रुग्णांना उपचारासाठी भरती केलेले ठिकाण (दवाखाना/ कोविड सेंटर) त्यांचे संपर्कात येणाऱ्यांची माहिती कोरोना संबंधित लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींची नावे इ. माहिती कार्यालयात कळविणे ही जबाबदारी पार पाडायची आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावयाची आहे. संपूर्ण शासकिय यंत्रणा, अधिकारी-कर्मचारी यांना सहकार्य करणे हे जागरूक नागरिक म्हणून आपले कर्तव्यच आहे. सर्व सन्माननीय नगरसेवकांना अशा समित्या स्थापन करण्याचे लेखी कळविलेले आहे.
–विजय वहाडणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *