आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त इमारत बांधकाम कामगारांसाठीआरोग्य शिबीर, मेळावा व किटचे वाटप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :-आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार (दि.०५) रोजी इमारत बांधकाम कामगारांसाठी कृष्णाई मंगल कार्यालयात सकाळी १०.०० वाजता मोफत सर्व रोग निदान शिबीर व मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोपरगाव मतदार संघातील नोंदणीकृत सर्व इमारत बांधकाम कामगारांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीर, तसेच जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना वेळेत उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण, तसेच नोंदणीकृत कामगारांना गृहोपयोगी व बांधकाम साहित्याचे कीटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ज्या इमारत बांधकाम कामगारांची अद्याप बायोमेट्रिक नोंदणी झालेली नाही अशा कामगारांची बायोमेट्रिक नोंदणी करण्यासाठी शनिवार (दि.०३) रोजी कोपरगाव येथील आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात येणार आहे.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील कामगारांना आरोग्य अबाधित राहावे व त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी या योजनांची सविस्तर माहिती व्हावी या उद्देशातून आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित मोफत सर्व रोग निदान शिबीर व बांधकाम कामगारांचा मेळावा तसेच साहित्य किटचे वाटप करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी कोपरगाव मतदार संघातील नोंदणीकृत सर्व इमारत बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *