माहेश्र्वरी समाजाच्यावतीने संत मीराबाई संगीतमय कथा उत्साहात संपन्न, आयोजकांचे हार्दिक अभिनंदन:- नारायण शेठ अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव माहेश्वरी समाज आयोजित प्रेम मूर्ती संत मीराबाई संगीतमय कथेचे वैष्णव भूषण श्री श्री श्री सुजितजी महाराज (देवरगावकर) यांच्या मधुर वाणीतून मीराबाईची प्रेम कथा कोपरगाव येथे पार पडली आयोजकांचे हार्दिक अभिनंदन
सहसा संत मीराबाई विषयी कथा पारायण प्रचार व प्रसार ऐकू येत नाही. संत मीराबाई विषयी कथा सांगणारे व समजून देणारे श्री श्री श्री.सुजितजी महाराज हे भारतातले एकमेव व्याख्याते असतील कथा सांगताना अक्षरशा श्री सुजितजी महाराज मंत्रमुग्ध होत…. प्रसंगी डोळ्यातून पाणी येत असे त्या मीराबाई कथेची समरस झालेले महाराज व श्रोता वर्ग भारावून गेले होते. मीराबाईचा आदर्श समाजापुढे यावा म्हणून श्री सुजित महाराजांचे हे प्रयत्न आहे प्रशंसनीय व अनुकरणीय आहे.आतापर्यंत समाजात मीराबाई विषयी अज्ञान आहे ते अज्ञान दूर करून मीराबाई ची खरी प्रेम कथा व भक्ती आपल्या अमोघ वाणीतून कोपरगावकरांना सांगितली शेवटच्या दिवशी अक्षरशः महाराज व कोपरगावकर मीराबाईचा विरह व मिलन यातील दुःख वेदना व आनंद ऐकून सर्व समाज हळहळत होता यातच मीराबाईच्या प्रेम कथेची यशस्विता व उपयोगिता लक्षात येते !आजच्या सिनेमा मध्ये उन्नमद व अश्लील खोट्या प्रेम कथा समाज नेहमीच पाहतो. पण मीराबाईची निर्दोष निष्पाप व खरी प्रेम भक्ती समाजाला नक्कीच प्रबोधनकारक ठरेल यात शंका नाही या कथेचे आयोजक “कोपरगाव माहेश्वरी समाज” यांचे कौतुक व अभिनंदन जितके करावे तितके थोडेच आहे पण ही कथा सर्वांसाठी ठेवलेली असतांना सर्वसामान्य जनतेने त्याचा लाभ घेतला नाही याची खंतही मनाला वाटते धन्यवाद..!
आपला नम्र-नारायण शेठ अग्रवाल कोपरगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *