कामगार संघटना शहर अध्यक्ष पदी विजय कुमावत यांची निवड:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
विश्वकर्मा बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेच्या देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष पदी विजय बाळासाहेब कुमावत यांची निवड झाले बद्दल देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम च्या वतीने वृक्ष भेट देऊन सन्मान करणेत आला.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाचे वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई च्या वतीने बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण कल्याणाच्या दिशेने वाटचाल करणेसाठी व कामगारपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहचवणे चे काम ही संघटना करणार असलेने या वेळी कुमावत यांनी सांगितले.
त्या प्रसंगी हेल्प टीम चे दत्तात्रय कडू पाटील, आप्पासाहेब ढुस, अनिस शेख, ऋषीकेश संसारे, सागर सोनवणे, खालिद शेख, दिपक संसारे, राजेंद्र ओहोळ, गोरख सरोदे, सुभाष गाडेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *