नाभिक समाजाच्या वतीने अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांना नाभिक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
नाभिक समाजाच्या वतीने पालकमंत्री मा छगनरावजी भुजबळ साहेब यांना नाभिक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांची नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष व शिष्टमंडळ यांनी भेट घेतली या भेटीदरम्यान माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना नाभिक समाजाच्या व्यथा व वेदना समजून सांगण्यात आले. उद्यापासून सलुन दुकान बंद हा जो निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला तो निर्णय मागे घ्यावा व सर्व दुकानदारांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मनोज वाघ , महाराष्ट्र कार्या़ध्यक्ष किरण भाऊ बिडवे, उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख सचिन सोनवणे, राहता तालुका अध्यक्ष अशोकराव कोरडे, कोपरगाव तालुका अध्यक्ष दिलीप जाधव , कोपरगाव संपर्कप्रमुख प्रवीण आहेर, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय आहेर, जिल्हा सरचिटणीस मनोज बिडवे, दिपक चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख किरण मदने, आदि समाज बांधव उपस्थित होते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आपले निवेदन स्वीकारले व मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत आपले निवेदन पोहचवतो अशी त्यांनी शिष्टमंडळास गवाही दिली माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचे संपूर्ण नाभिक समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *