क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अंबादास खैरे यांची फेरनिवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समिती, नाशिक च्या अध्यक्ष पदी अंबादास खैरे यांची फेरनिवड झाली. द्वारका येथील माळी मंगल कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या समितीच्या बैठकी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
मागील कार्यकाळातील अंबादास खैरे यांचा प्रदीर्घ अनुभव व जयंतीचे अचूक नियोजन बघता तसेच समितीच्या माध्यमातून राबविलेले विविध सामाजिक उपक्रम आणि समितीच्या कामांकरीता घेतलेली मेहनत व दिलेला मौल्यवान वेळ बघता अंबादास खैरे यांची सर्वानुमते क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी फेरनिवड करण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला.
कार्यकारिणी अध्यक्ष शशी हिरवे, महिला अध्यक्ष तेजश्री हिरवे, कार्याध्यक्ष शरद मंडलिक, उप कार्याध्यक्ष दिपक मौले, उपाध्यक्ष शंतनू शिंदे, मोहन माळी, संदीप बनकर, विशाल जेजूरकर, श्रीराम मंडळ, राहुल घोडे, नंदू काहार, भूषण शिरसाठ, सुभाष काठे यांची निवड करण्यात आली. तर सरचिटणीस भास्कर जेजूरकर, ज्ञानेश्वर सोमासे, सोपान पुंड, संजय अभंग, गणेश खोडे, तुषार विधाते यांची निवड करण्यात आली. संघटक प्रमोद बनकर, महेश ढोले, विनोद डोके, विलास वाघ, रविंद्र शिंदे, गणेश काठे, रामेश्वर साबळे, सागर बेदरकर, खजिनदार संदीप गांगुर्डे, उप खजिनदार नाना नाईकवाडे प्रसिद्धी प्रमुख संतोष पुंड, संतोष खैरे, सागर वझरे द्वारका विभाग अध्यक्ष सचिन काठे, मध्य नाशिक अध्यक्ष रुपेश शेवाळे, नाशिकरोड विभाग अध्यक्ष विशाल गाडेकर, जेलरोड विभाग अध्यक्ष स्वप्नील फुले, उपनगर विभाग अध्यक्ष ज्ञानदेव जाधव, पंचवटी विभाग अध्यक्ष दिपक मंडलिक, मखमलाबाद विभाग अध्यक्ष संजय रासकर, आडगाव विभाग सचिन खोडे, नविन नाशिक अध्यक्ष कृष्णा काळे, सिडको अमोल नाईक, सातपूर अध्यक्ष विवेक सोनवणे, आनंदवली अध्यक्ष शरद काळे, पाथर्डी फाटा अध्यक्ष सागर गाडेकर, इंदिरानगर अध्यक्ष निलेश खोडे आदींची निवड करण्यात आली.
महिला कार्यकारिणी द्वारका विभाग भारती शेलार, पंचवटी विभाग अध्यक्ष दीप्ती हिरवे, आडगाव विभाग कोमल खोडे, मखमलाबाद विभाग राजश्री गायकवाड, सातपूर विभाग संजीवनी जाधव, सिडको विभाग हर्षा फिरोदिया, मध्य नाशिक संगिता जाधव, आनंदवली स्वाती शेलार, इंदिरा नगर अध्यक्ष संगिता गिते, पाथर्डी फाटा अध्यक्ष अर्चना महाजन यांची विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी बाजीराव तिडके, विजय राऊत, सुनिल फरांदे, सुनिल खोडे, शंकर मोटकरी, अरुण थोरात, ज्ञानेश्वर महाजन, गिरीश बच्छाव, शंतनु शिंदे, सुभाष काठे, प्रमोद बनकर आदि मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *