सर्व वकिलांना कोविड लसीकरण उपलब्ध करून घ्यावे:- अँड.नितीन पोळ…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
मागील एक वर्षांपासून डॉक्टर,पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमाणेच वकील देखील तारेवरची कसरत करून करोना साथीच्या काळात आपली सेवा देण्याचे काम करत असून शासकीय कर्मचारी व पत्रकार यांच्या प्रमाणेच सर्व वकिलांना कोविड लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की
गेल्या एक वर्षांपासून इतर कोविड योध्याप्रमाणे वकील देखील आपली भूमिका प्रामाणिक पणे निभावत आहे मागील अनेक महिने कोर्ट कामकाज मर्यादित स्वरूपात सुरू होते त्यातच आता कोर्ट कामकाज बऱ्यापैकी सुरू झालेले आहे मागील कालावधीत अनेक वकील व न्यायाधीश यांना करोना ची लागण झाली त्याच प्रमाणे त्यात अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे सर्व शासकीय कर्मचारी व पत्रकार यांना त्याच प्रमाणे आता सर्व सामान्य नागरिकांना कोविड लस सर्व शासकीय दवाखाने व आरोग्य उप केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र सद्या करोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे कोर्टात विविध भागातून अनेक पक्षकार,आरोपी, पोलीस त्याचप्रमाणे त्यांचे नातेवाईक यांचे येणे जाणे असते कोर्टात प्रवेश करताना सर्वांची तपासणी केली जाते मात्र सर्वच वकिलांना लस घेण्यासाठी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आरोग्य विभागाने नियोजन केल्यास एका वेळी सर्व वकिलांना लस घेता येईल त्यामुळे आरोग्य विभागाने तशी व्यवस्था करावी असे या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *