

कोपरगाव प्रतिनिधी :- निष्काम कर्मयोग राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व मैलागिरीजी महाराज यांच्या कृपेने श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर मळेगाव थडी आश्रम येथे दिनांक 18 डिसेंबर 2023 वार सोमवार रोजी सायंकाळी ठीक 7: 00 वाजता माॅ नर्मदा कृपांकित मठाधिपती परमपूज्य स्वामी कैलासानंदगिरीजी महाराज यांचा 29 वा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात येत आहे तरी या सदर प्रसंगी प्रमुख उपस्थिती प पु स्वामी रमेशगिरीजी महाराज
अनंतविभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष पंच दशनाम जुना आखाडा नीलगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर
प पु स्वामी राघवेश्वरानंदगिरी जी महाराज व अनेक साधू संतांच्या उपस्थितीत हा अभिष्टचिंतन सोहळा साजरा होत आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहून साधुसंतांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व अभिष्टचिंतन सोहळ्याची शोभा वाढवावी.
