
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरामध्ये कोरोना बाबत शासनाने आखून दिलेले नियम न पाळणाऱ्या व्यापारी आस्थापनांवर आज तहसीलदार , मुख्याधिकारी आणि पोलिसांनी मिळून संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केल्याने नियम न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
कोपरगाव तालुका आणि शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने प्रशासन नागरिकांना आणि दुकानदारांना कोरोना बाबत नियम पाळून व्यवसाय करण्याचे आवाहन करीत आहे . असे असतानाही बाजारपेठेत बरेच दुकानदार आणि ग्राहक मास्क न वापरता फिरताना आढळून येत आहे .दुकानांमध्ये दुकानदार आणि ग्राहक सोशल डिस्टंसिंग पाळत नसल्याचे दिसत असल्याने . आज कोपरगाव नगरपालिकेचे अधिकारी , कर्मचारी , तहसीलदार , आणि पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संयुकपणे अशा नियम मोडणाऱ्या दुकानांवर कारवाई करीत दुकाने सील केले. तसेच यावेळी दुकानात उपस्थित असलेल्या ग्राहकांवरही दंडात्मक कारवाई . केली . या आज भाजी बाजारातील दीपक इलेकट्रीकस पासून या कारवाईला सुरवात करण्यात आली.
या कारवाई बाबत माहिती देताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले कि जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे . त्याप्रमाणे आज पासून या नियम न पाळणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये दोषी दुकानदारांचे दुकान सात दिसांची सील करून त्यावर दंडही आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या आस्थापनांवर कारवाई टाळण्यासाठी सर्वानी कोरोनाचे नियम पाळून आपले इतरांच्याही जीविताची काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार चंद्रे यांनी जनतेला केले आहे. या कारवाई मध्ये तहसीलदार योगेश चंद्रे , नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील बोर्डे, बांधकाम अधिकारी दिगंबर वाघ, पो. नि. वासुदेव देसले , आणि इतर कर्मचारी सहभागी होते .
