
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि. 5/10/23 रोजी dysp संदीप मिटके यांना गुप्त माहिती मिळाली की कदम वस्ती ममदापूर ता.राहाता येथील अक्षय भास्कर कदम याचे घराजवळ असणारे पत्र्याचे शेडमध्ये वसीम हानिफ कुरेशी रा. ममदापूर हे दोघे संगणमत करून कत्तलीकरिता गोवंश जातीचे जनावरे आखुड दोऱ्याने बांधून ठेवले बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेश दिल्याने पथकातील इरफान शेख ,अशोक शिंदे,श्याम जाधव यांनी पंचासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून एक लाख 83 हजार रुपयाच्या गोवंश जनावरे ताब्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी केली व दोन्ही आरोपींविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक अशोक शिंदे यांचे फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 600/2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायदा अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर Dysp संदीप मिटके यांचेमार्गदर्शनाखाली हे.कॉ.इरफान शेख,पो. ना. अशोक शिंदे ,श्याम जाधव यांनी केली.
