कोपरगांव पिपल्स बॅकेचे विस्तारीत हाॅलमध्ये कै. सुनिल कंगले यांची श्रध्दांजलीपर सभा संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कै. सुनिल कंगले यांची श्रध्दांजलीपर सभा-
कोपरगांव पिपल्स बॅकेचे माजी चेअरमन तथा संचालक व कोपरगावातील प्रसिध्द पेढी कंगले एन्ड सन्स चे संचालक कै. सुनिल कंगले यांचे दि. 01 सप्टेंबर, 2023 रोजी दुखद निधन झालेने त्यांची श्रध्दांजलीपर सभा कोपरगांव पिपल्स बॅकेचे विस्तारीत हाॅलमध्ये झाली सदर सभेस पिपल्स बॅकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे यांनी प्रास्तावीक केले त्यांनी कै. सुनिल कंगले यांचे कार्याचा आढावा घेत त्यांनी वेगवेगळया क्षेत्रातुन केलेल्या कामाचे विश्लेषन केले. यावेळी डाॅ. हेमंत राठी, प्रदिप नवले, डाॅ. विलास आचारी, सुनिल बंब, रविंद्र लोहाडे, अँड मिलींद गुजराथी, जितेंद्र छाजेड यांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली. सौ. सुधाभाभी ठोळे यांनी श्रध्दांजलीपर गायन केले. सदर कार्यक्रमास पिपल्स बॅकेचे सर्व संचालक व सेवक वर्ग तसेच रविंद्र बंब, अरविंद पोरवाल, विजय बंब, दिपक एकबोटे, कंगले कुटुंबीय व इतर मान्यवर उपस्थित होते. शेवटी अनिल कंगले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले सुत्रसंचालन पुजा पापडीवाल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *