

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळगांवथडी येथे धर्मग्रंथा बाबत जी घटना घडली त्यातील आरोपीस अद्यपी अटक झालेली नाही. त्यामुळे निश्चितच गुन्हा करणा-यांचे मनोधैर्य वाढलेले आहे. त्यातुन समाज व्देष व तेढ वाढविणा-या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. गैरकृत्य करणा-या इसमावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे. अदयापही कोणतीही कारवाई झालेली नाही. गुन्हेगारांवर कारवाई नाही, गुन्हेगारांना अटक नाही त्याचा सर्व मुस्लिम समाज निषेध करीत आहे व गुन्हेगारांना त्वरीत अटक यासाठी समस्त मुस्लिम समाज दिनांक २२/०८/२०२३ रोजी मंगळवार सकाळी ११ वाजता आमरण उपोषणासाठी तहसिल कार्यालय कोपरगाव येथे बसणार आहे. तरी सर्व प्रशासनास विनंती की गुन्हेगारांना त्वरीत अटक व्हावी. नाहीतर समस्त मुस्लिम समाज उपोषणास बसतील याची नोंद घ्यावी.असे दि.१८ आँगस्ट रोजी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर हाजी अल्ताफ कुरेशी,अकबर शेख,अस्लम गफूर शेख,सलीम युसूफ पठाण , मुन्ना मन्सूरी, अमन भाई मनियार , अजिज शेख,शकील अत्तार टायर,फकीर मामू कुरेशी रियाज सर , समीर दादाभाई शेख , हाजी हारून ईस्माइल हाजी सद्धामभाई सय्यद,बाबू भाई ,मौलाना मुख्तार ,अमजद भाई शेख, इम्तियाज अत्तार ,नवाज कुरेशी पप्पू भाई सय्यद आदि मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.
