
कोपरगांव प्रतिनिधी:- अहमदनगर, औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यात शाखा विस्तार असलेली कोपरगांव पिपल्स को-ऑप. बँकेने बुधवार दि.०९.०८.२०२३ रोजी QR कोड चा शुभारंभ बँकेचे चेअरमन कैलासचंद भागचंद ठोळे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
बँकेचे विद्यमान चेअरमन कैलासचंद ठोळे यांनी सांगीतले की, बँकेचे अमृत महोत्सव वर्ष चालु असून अमृत महोत्सवी वर्षात बँकेने डिजीटल बँकींग युगाची सुरूवात करून मोबाईल बँकींग सुविधा, गुगल पे, फोन पे यु.पी.आय. या सुविधेबरोबरच QR कोड सुविधेचा शुभारंभ सुध्दा केलेला आहे.
या प्रसंगी बँकेचे खातेदार विशाल बडजाते. सुशांत घोडके, सतिष उपाध्ये, अमोल सानप, श्रीकांत राठी यांना प्रातिनिधीक स्वरूपात QR कोड चे वाटप करून शुभारंभ करण्यात आला.
त्या वेळी उपस्थित खातेदार यांनी सांगितले की, आपल्या कोपरगांव पिपल्स बँकेने डिजिटल युगानुसार बदल करून डिजिटल प्रणाली चालु केल्यामुळे बँकेच्या खातेदारांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ झाले असून बँकींग व्यवहार करण्याकरीता खातेदारांना आपल्या दुकानांतून किंवा घरीबसुन व्यवहार करता येत आहे. त्यामुळे आपल्या पिपल्स बँकेने चालु केलेल्या डिजिटल बॅकींग करीता शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोहकरे व संचालक कल्पेश शहा, धरमकुमार बागरेचा, सुनिल बंब, सत्येन मुंदडा, रविंद्र ठोळे, सुनिल बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे, असि. जन. मॅनेजर जितेंद्र छाजेड़ व बँकेचा सर्व सेवक वर्ग उपस्थित होते. मुख्य कार्यालयातील संगणक विभाग यांनी उत्कृष्ठ काम केल्या बद्दल संगणक विभागांचे प्रमुख श्री. चंद्रशेखर व्यास व गणेश काळे यांचा सत्कार करण्यात आला व सुत्रसंचालन सौ. पुजा पापडीवाल यांनी केले.
