
कोपरगाव प्रतिनिधी:-
जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील संदर्भिय पत्रानुसार तहसिल कार्यालय कोपरगांव अंतर्गत कोतवाल या संवर्गाची 1. मळेगांव थडी 2. चासनळी 3. रवंदे 4. संवत्सर 5. माहेगांव देशमुख 6 मंजूर 7. कोकमठाण 8. चांदेकसारे 9. धोत्रे 10. करंजी बु. 11. येसगांव 12 ब्राम्हणगांव या सजेची एकुण 12 पदे रिक्त आहेत.मा. कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र क्रमांक संकीर्ण-2023/प्र.क्र.17/ई-10 दिनांक 17/05/2023 अन्वये सदर रिक्त पदापैकी 80 टक्के मर्यादेत पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणून शासनाने.मान्यता दिलेली आहे. कोपरगाव तालुक्यात भरतीकामी कोतवाल संवर्गाची बिंदु नामावली मा. विभागीय आयुक्त, नाशिक (मागासवर्ग कक्ष) यांचेकडील पत्र क्रमांक माक/कार्या- 18/कावि-2/ एसआर/483/2023 दिनांक 21/07/2023 अन्वये मंजुर करण्यात आलेली आहे.
उक्त नमुद सजेतील रिक्त पदापैकी 80 टक्के मर्यादेत एकुण 10 कोतवाल पदांची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत मा. उपविभागीय अधिकारी शिर्डी भाग शिर्डी तथा कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 08/08/2023 रोजी दुपारी 04:00 वाजता तहसिल कार्यालय कोपरगांव येथे काढण्यात येणार आहे. तरी सदर आरक्षण प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याकरिता इच्छुक नागरिकांनी वरील नमुद दिनांक, वेळ व ठिकाणी उपस्थित रहावे.असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात तहसीलदार भोसले साहेब म्हणाले आहे.
