

कोपरगाव प्रतिनिधी:-
नगरपालिका शाळा नं.५, बेट कोपरगाव या शाळेत विद्यार्थ्यांना नुकतेच स्कुल बॅग चे वाटप करण्यात आले. नगरपालिका शाळेत आर्थिक दुर्बल घटकातील पालकांची मुले शिक्षण घेतात. अशा होतकरू व गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये म्हणून कल्पना सोनवणे या नेहमी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करतात.या प्रसंगी सर्व पाहुणे व मान्यवर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.कै ज्ञानदेव भानुदास सोनवणे सेवा भावी संस्थचे अध्यक्ष कल्पना सोनवणे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कुल बॅग चे मोफत वाटप केले.


सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. लीलावती जमधडे होत्या. कल्पना सोनवणे यांनी आपल्या मनोगतात – विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्या अभावी शिक्षण अर्धवट सोडू नये. रोज शाळेत उपस्थित राहून शिक्षण घ्यावे” अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात जमधडे यांनी शालेय संस्कार व सोनवणे मॅडम यांचे दा्तृत्व याबद्दल मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांचे चेहरे दप्तर बघून आनंदाने उजळून निघाले.सदर कार्यक्रमांस शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी, सुनिल रहाणे, नसरीन इनामदार,अमोल कडू,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा पूनम गगे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.नसरीन इनामदार यांनी सूत्रसंचलन केले व विलास माळी यांनी आभार मानले .
