
आग न्यूज नेटवर्क
मानवी आयुष्य अनंत संकटात गुरफटलेले असते. या संकटातून काहींना स्वबळावर मुक्ती सहजासहजी शक्य होते. परंतु समाजातील अपवाद वगळता सर्वा़ना आधार घेण्याशिवाय पर्याय उपलब्ध नसतो अशा कठीण परिस्थितीत काही संकट मोचक न बोलावता निस्वार्थी पणे स्वतःला झोकून देऊन आपदग्रस्तांना आधार देतात.
कोल्हे कुटुंबिय हा वसा सलग तीन पिढ्या कोणी निंदो अथवा वंदो, सत्तेवर असो वा नसो जोपासत आहे.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून नितीनदादा , बिपीनदादा, सौ मनाली वहिनी साहेब, प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलतावहिनीसाहेब, अमित दादा, सुमित दादा विवेक भैय्या व संपूर्ण कोल्हे परिवार महापूर , पाणीटंचाई, आदी अनंत महाप्रलयात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून देतात हे काळाच्या ओघात सतत सिध्द झाले आहे.
यात गोदावरी नदीच्या महापूरात मायगावदेवी मंदिर कळसावर अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी सत्तेवर नसताना केंद्र व राज्य शासन, नासिकचे आर्टिलरी सेंटर अधिकाऱ्यांर्शी संपर्क साधून हेलिकॉप्टर लष्करी जवानांच्या सह उपलब्ध करून घेतले. परंतु महाप्रलयात भितीने कळस सोडण्यास नागरिकांनी नकार दिल्यानंतर स्वतः बिपीनदादा जवानासह प्रथम दोरखंडांच्या सहाय्याने कळसावर उतरले . सर्वांना समजावून सर्वांच्या शेवटी हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी पोहचले.
आपल्या हक्काच्या धरणातील पाण्यासाठी नांदुरमध्यमेश्वरला स्वतःचे आरोग्य धोक्यात असतांनाच वैद्यकीय अधिकांऱ्यांचा सल्ला धुडकावून प्राणांतिक उपोषण डास, हिंस्त्र प्राणी निवड अंधारात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशस्वीपणे केले याच पध्दतीने नवी दिल्ली येथील आठ दिवसांच्या अखंड अतिश्रमाने आजारी असलेल्या बिपीनदादांनी पुरेशी विश्रांती न घेता निळवंडे धरणाचे कालवे पूर्ती व दुष्काळग्रस्तांना पाणी मिळविण्यासाठी झालेल्या बेमुदत आंदोलन स्थळी धाव घेऊन तळपत्या उन्हात कार्यकर्त्यांबरोबर सहभागी झाले. ही दोन्ही आंदोलने बिपीनदादांच्या जिवावर बेतल्याने अतिदक्षता विभागात त्यांचेवर उपचार करण्यात आले. परंतु बिपिन दादा कधीच मागे हटले नाही.
कोपरगाव शहरातील २१दिवसाआड पिण्याचे पाणी टंचाई काळात अहोरात्र संजीवनी उद्द्योगाचे स्वत:चे पाणी नियोजन करून स्वखर्चाने नागरिकांना पुरविले. यावेळी नितीन दादा , बिपीनदादा , सौ. स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब, विवेक भैय्यासह संपूर्ण कोल्हे कुटुंबिय शहरात प्रत्यक्ष भेटीत जनतेला आधार देत राहिले.
याशिवाय सर्वच नैसर्गिक , आरोग्य, मानवी संकटात, शिक्षण , रोजगार, महिला बचत गट, नोकऱ्यांमध्ये विक्रम घडविण्यासाठी बिपीनदादा कधीच मागे हटले नाही. याचमुळे जनतेने जनतेच्या हृदयात संकटमोचक बिपीन दादा कोल्हेंना अढळपदीआरुढ केले. बिपीन दादा कोल्हेंच्या कार्याचा केवळ ट्रेलर आहेअशा बिपीन दादा कोल्हेंना भावी आयुष्य आरोग्य सुखसमृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
- नारायण अग्रवाल , व विरेन अग्रवाल , अग्रवाल चहा कंपनी ,मेन रोड , कोपरगाव
