मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार श्री अंकुश चौधरी यांनी गुरू शुक्राचार्य मंदिरात महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेतले:- बाळासाहेब आव्हाड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
११ जून २०२३ रविवार रोजी सकाळी आपल्या गुरू शुक्राचार्य मंदिरात महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी मराठी फिल्म इंडस्ट्री तील सुपरस्टार श्री अंकुश चौधरी आले होते . मंदिरात आले नंतर त्यांचे हस्ते महाराजांची आरती करण्यात आली, सर्व मंदिर परिसर पहिल्या नंतर त्यांचा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मंदिरा चा इतिहास त्याचे असलेले शुभ कार्यासाठी मुहूर्त न पाहण्याचे वेगळेपण , तसेच कलेची देवता असलेले शुक्र ज्यांचा शुक्र पावरफुल त्याचा कला क्षेत्रात अधिक अधिक प्रगती होते हे जाणून घेतल्यावर श्री अंकुश चौधरी यांनी समाधान व्यक्त केले व मंदिरातील अतिशय प्रसन्न व धार्मिक मंगल मय वातावरण अनुभवल्या मुळे आपण भारावून गेलो असल्याचे मत व्यक्त केलं.


या प्रसंगी ट्रस्ट अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड , मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी , उप मंदिर प्रमुख श्री प्रसाद पऱ्हे, श्री संजय वडांगळे , श्री बाळासाहेब लकारे , श्री प्रसाद साबळे , श्री पांडोरे साहेब , मंदिर व्यवस्थापक श्री राजाराम पावरा , मंदिर पुजारी श्री राजू गुरू व जोशी गुरू व असंख्य भाविक भक्त व गावकरी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *