चांदेकसारेत मुकुंद होन यांचा जाहीर नागरी सत्कार संपन्न..!!

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(जेऊर कुंभारी):-
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांचे सुपुत्र मुकुंद होन यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)च्या परीक्षेत
  राज्यात २००वा रँक मिळवला असुन सरकारी नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती दरम्यान राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यानुसार त्यांची सरकारी लेबर ऑफिसर या पदावर नियुक्ती झाली त्याबद्दल मंगळवार दि.६जुन रोजी येथील स्व. शंकररावजी कोल्हे साहेब सभागृहात भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमचे प्रस्तावीक शांतीलाल होन यांनी केले.
कार्यक्रमाच्याअध्यक्षपदी सरपंच किरण होन,आणी प्रमुख पाहुणे म्हणुन मालेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव उपस्थितहोते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच किरण होन,प्रमुख पाहुणे मालेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, मनसुख महाराज दहे, संचालक बाळासाहेब वक्ते,माजी सभापती शिवाजी वक्ते, माजी सभापती अनुसयाताई होन,
अरूण यवले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच
यावेळी चांदेकसारे क्रिकेट संघाचा कर्णधार किरण रावसाहेब होन, चांदेकासारे शाळेतील दहावी परिक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचा सत्कार करण्यातआला.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले की स्पर्धा परिक्षेच्या माध्यामातुन ग्रामिण भागातील तरूणांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहे. आपल्या जवळ जिद्द व चिकाटी असेल तर ते यश संपादन करू शकतो मुकुंद केशवराव होन यांनी आपल्या मेहनत व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले व तरूणां समोर एक आदर्श ठेवला असल्याचे सांगितले.तसेच माजी सभापती अनुसयाताई ताई होन यांनी सांगितले की शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे असे सांगितले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी सरपंच किरण होन,उपसरपंच सचिन होन महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, माजी सभापती शिवाजी वक्ते ,अरूण यवले, कोळपेवाडी कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण,आनंदराव चव्हाण, रोहिदास होन,उपसरपंच सचिन होन, राहुल होन,हरिभाऊ शिंदे, रामदास शिंदे,व्ही.टी.होन,धीरज बोरावके,माजी सरपंच केशवराव होन, विजय होन,आप्पा शाहजी वक्ते, पाटीलबा वक्ते,तुषार गुरसळ,पत्रकार किसन पवार,किरण वक्ते, राहुल वक्ते, साईआधार प्रतिष्ठाण,शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे सर्व पदाअधीका व पंचक्रोशीतच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सत्कार मूर्ती मुकुंद होन यांनी सांगितले जो आज सत्कार झाला हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे.मी
अधिकारी होण्यासाठी माझे वडील यांचे खूप मोठे श्रम आहेत व वडील हेच माझे प्रेरणास्थान आहे व माझ्या यशाचे श्रेय माझे कुटुंब माझे मित्र यांना देतो.ग्रामीण भागातील तरुणांना मी मार्गदर्शन करण्याची माझी इच्छा आहे कारण ग्रामीण भागातील तरुणांना योग्य मार्गदर्शनाची खूप आवश्यकता असते. तसेच साई आधार प्रतिष्ठान च्या माध्यमातून राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र चालू करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शेवटी उपस्थितांचे आभार माजी सरपंच केशवराव होन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *