कोपरगाव येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची १२वी निकालाची उत्कृष्ट परंपरा….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा….
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित कोपरगाव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२3 मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
१२ वी विज्ञान शाखा – खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) बजाज मनजीत अजित एकूण गुण – 541 एकूण टक्के – 90.17 %
२) औताडे सिद्धी दत्तात्रय एकूण गुण – 509 एकूण टक्के – 84.83 %
३) केकाण साक्षी किरण एकूण गुण – 494 एकूण टक्के – 82.33 %
१२ वी वाणिज्य शाखा – खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) म्हसणे कीर्ती वाल्मिक एकूण गुण – 542 एकूण टक्के – 90.33 %
२) रोहमारे प्रीती प्रशांत एकूण गुण – 531 एकूण टक्के – 88.50 %
३) चौधरी उदय जनार्धन एकूण गुण – 528 एकूण टक्के – 88.00 %
१२ वी कला शाखा – खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) लोखंडे मयुरी संजय एकूण गुण – 479 एकूण टक्के – 79.83 %
२) पवार तनुजा लक्ष्मण एकूण गुण – 470 एकूण टक्के – 78.33 %
३) तांबे रेणुका सुनील एकूण गुण – 470 एकूण टक्के – 78.33 %
4) पवार संजना पोपट एकूण गुण – 467 एकूण टक्के – 77.83 %
महाविद्यालयाचा एकूण कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेचा मिळून निकाल 96.25 %
यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त श्री. संदीप रोहमारे, सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सोनवणे बी. आर., रजिस्ट्रार डॉ. नाईकवाडे ए. सी. यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश प्रकिया सुरु झाली असून महाविद्यालयाचे पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट करियर ओरिएंटेड अभ्यासक्रम बी.बी.ए.(सीए.), बी.सी.एस., बी.सी.ए. (सायन्स), बी.एस्सी. (सूक्ष्म जीवशास्त्र) हे चालू आहेत. प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन त्वरित प्रवेश घ्यावा असे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *