कोपरगांव प्रतिनिधी :-
कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कोल्हे गटाचे साहेबराव किसन रोहोम तर उपसभापतीपदी काळे गटाचे गोवर्धन बाबासाहेब परजणे यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहाय्यक निबंधक नामदेवराव ठोंबळ होते. अध्यक्षस्थानी कृषीरत्न दत्तात्रय कोल्हे होते.
श्री. साहेबराव रोहोम यांच्या नावाची सुचना संचालक प्रकाश गोर्डे यांनी केली तर त्यास संचालक साहेबराव लामखडे यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी संचालक सर्वश्री. बाळासाहेब गंगाधर गोर्डे, शिवाजीराव बापूराव देवकर, लक्ष्मण विश्वनाथ शिंदे, संजय माधवराव शिंदे, मिराताई सर्जेराव कदम, माधुरी विजय डांगे, खंडेराव पुंजाबा फेफाळे, राजेंद्र शंकरराव निकोले, रावसाहेब रंगनाथ मोकळ, अशोकराव सोपान नवले, रामदास भिकाजी केकाण, रेवणनाथ श्रीरंग निकम, ऋषीकेश मोहन सांगळे, रामचंद्र नामदेव साळुंके उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती साहेबराव रोहोम व उपसभापती गोवर्धन परजणे यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार करतांना बिपीनदादा कोल्हे म्हणाले की, बाजार समिती ही शेतक-यांची व तालुक्याची कामधेनु आहे त्यात राजकारण आणायचे नाही ही माजीमंत्री स्व. शंकरराव काळे व स्व. शंकरराव कोल्हे यांची शिकवण असल्याने सर्वांच्या हितासाठी हा निर्णय घेतला त्यास आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, पोहेगांव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीनराव औताडे व सभासद शेतक-यांनी मोलाचे सहकार्य केले. नवनिर्वाचित संचालक मंडळाला शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी यांच्यासह सर्व घटकांना बरोबर घेवुन कोपरगांव बाजार समितीच्या उन्नतीसाठी काम करावयाचे असुन त्यांनी कुठल्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण न आणता कारभार करून जिल्हयाबरोबरच राज्यात कोपरगांव बाजार समितीचा नांवलौकीक वाढवावा, माजी सभापती व उपसभापती व संचालक मंडळाने केलेल्या कार्याचा गौरव बिपीनदादा कोल्हे यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला.
सत्कारास उत्तर देतांना सभापती साहेबराव रोहोम म्हणाले की, भाजपाचा तालुकाध्यक्ष म्हणून काम केल्याच्या अनुभवातुन बाजार समितीचा सभापती होण्याची संधी युवा नेतृत्व व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे, प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली. सभासदांनी जो विश्वास टाकला त्या संधीचे सोने करू.
याप्रसंगी सर्वश्री. अरूणराव येवले, त्रंबकराव सरोदे, विश्वासराव महाले, शिवाजीराव वक्ते, बापूसाहेब सुराळकर, कृष्णा परजणे, कोसाकाचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे, मच्छिंद्र टेके, नानासाहेब गव्हाणे, प्रदिप नवले,संदिप देवकर, सुनिल देवकर, राजेंद्र देवकर, हेमंत निकम, सतिष बोरावके, प्रशांत वाबळे, अनिल चरमळ, बाबासाहेब महाले, विश्वास बोळीज, दिपक चौधरी, विक्रम पाचोरे, धरमशेठ बागरेचा, देवेंद्र रोहमारे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी व बाजार समितीचे सर्व अधिकारी उपस्थित होते. शेवटी सचिव नानासाहेब रणशुर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

फोटोओळी:-कोपरगांव-
कोपरगांव बाजार समितीचे सभापतीपदी कोल्हे गटाचे साहेबराव रोहोम तर उपसभापतीपदी काळे गटाचे गोवर्धन परजणे यांची बिनविरोध निवड झाल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कार केला.
