के. जे. सोमय्या महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बीसीए व रुबिकॉन स्किल डेव्हलपमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.13 ते 16 मार्च रोजी चार दिवसीय सॉफ्ट स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत संभाषण कौशल्य, मुलाखतीची तयारी, ग्रुप डिस्कशन, ई-मेल रायटिंग या विषयावर विविध तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन संपन्न झाले. या चर्चासत्राचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यशाळेचे मार्गदर्शक मिर्झा अर्शद बेग यांनी रुबिकॉन स्किल डेव्हलपमेंटची कार्यपद्धती समजून सांगतांनाच उपस्थित विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य, ग्रुप डिस्कशन, ई-मेल रायटिंग या विषयावर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विस्तृत मार्गदर्शन केले. मा. अमृत कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या शाखेच्या माध्यमातुन मिळणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी व त्यासाठी आत्मसात करावयाचे कौशल्य यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे यांनी शुभेच्छा देतांनाच महविद्यालयात संपन्न होत असलेल्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी आपल्या मनोगतात बीसीए विभागाचे महत्व नमूद करतांनाच रोजगार उपलब्धतेसाठी संभाषण कौशल्य आत्मसात असणे आवश्यक आहे असे सांगितले. याप्रसंगी प्रो. डॉ. विजय ठाणगे, प्रा.रईस शेख, प्रा. पंकज पाटील यांच्यासमवेत बी.सी.ए. विभागातील 135 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *