कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी देवून मतदार संघातील बहुतांश रस्त्यांच्या समस्या सोडविण्यात यश आले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथे २० लक्ष रुपये निधीतून इजिमा १६०, कैलास शिंदे घर ते किरण देवकर घर रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मतदार संघातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. अनेक महत्वाच्या रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य होते व मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची देखील परिस्थिती अतिशय वाईट होती. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देवून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी मिळवून मतदार संघातील रस्त्यांच्या समस्या सोडविण्यात यश आले आहे. उर्वरित रस्त्यांना देखील लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक विष्णु शिंदे, माजी संचालक हरिभाऊ शिंदे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक विक्रम मांढरे, सरपंच सौ.साधना दवंगे, आण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब शिंदे, नितीन शिंदे, अनिल दवंगे, संदीप बारवकर, विजय इंगळे, गोरक्षनाथ जाधव, संजय नाईक, नवनाथ दवंगे, दशरथ रणशुर, सोपानराव सोनवणे, देवराम बोडखे, जालिंदर शिंदे, संजय दवंगे, सुयोग होन, प्रमोद शिंदे, सचिन शिंदे, गणेश बागुल, किरण देवकर, सीताराम शिंदे, गौरव शिंदे, रणजित घागरे, सुनील बारवकर, सुभाष दवंगे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ:- मुर्शतपुर येथे रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर.
