
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोकमठाण येथिल प्रगतशील शेतकरी, वारकरी सांप्रदायाचे अनुयायी त्रिंबक बाजीराव लोंढे (वय ८५) यांचे आज पहाटे २ वाजता त्यांचे राहते घरी दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, २ मुले, ३ मुली, नातवंडे असा मोठा परीवार आहे.
कै. त्रिंबक लोंढे हे उत्तम मृदंग वादक होते. त्यांनी अनेक मृदंग वादक घडविले. आषाडी -कार्तिकी एकादशीला ते आयुष्यभर पंढरपुरची वारी न चुकता करायचे. कोकमठाण आणि पंचक्रोशीत कोठेही भजन किंवा किर्तण असले तरी मृदंग वाजविण्यासाठी अथवा भजन गायणासाठी ते हजर राहत असे. त्यांनी आपल्या मुला मुलींवर उत्तम संस्कार केले असुन संपुर्ण कुटूंब सुशिक्षित आणि संस्कारीत करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. सामाजिक कार्यात ते नेहमी पुढे असत. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावु होता. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री. नितिनदादा कोल्हे यांचे स्वीय सहायक श्री नानासाहेब लोंढे यांचे ते पिताश्री होते.
कै. त्रिंबक लोंढे यांच्या निधनाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, माजी आमदार व बीजेपीच्या सेक्रेटरी सौ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी तिव्र दुःख व्यक्त केले.
फोटोः कै. त्रिंबक बाजीराव लोंढे
