

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक १४/०२/२०२३ रोजी कोपरगाव नगरपरिषदेमार्फत मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री शांताराम गोसावी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आणि नगरपरिषद शिक्षण मंडळ कोपरगाव यांचे मार्फत आयोजित शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते.
या प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मा.श्री.सुनील गंगुले,भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मा.श्री पराग संधान,शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मा.श्री.पटारे साहेब,कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मा.श्री.ज्ञानेश्वर चाकणे,प्रसिद्ध उद्योजक श्री.सोमेशजी कायस्त आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के .आढाव विद्यालयाचे शिक्षक श्री,वळवी सर यांनी केले. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी शालेय उपक्रमाचा भाग म्हणून शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या शालेय क्रीडा महोत्सवात शहरातील अनेक शाळेचा सहभाग नोंदविला जातो. खो-खो, कब्बडी, लिंबू चमचा इ.मैदानी खेळांचा सहभाग या ठिकाणी केला जातो.
आजच्या मोबाईलच्या युगात विध्यार्थी विकासात मैदानी खेळाचे महत्व सांगतांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.सुनिल गंगुले म्हणाले कि शिक्षणा बरोबरच मैदानी खेळ देखिल महत्वाचे आहे.मैदानी खेळ खेळल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहतेच त्याच बरोबर आपल्याला जर कधी अपयश आले ते पचविण्याची शक्ती मिळते आणि आपण पुन्हा नव्या जोमाने कार्य करण्यास प्रवृत्त होतो. त्याचप्रमाणे कोपरगाव नगरीचे प्रसिद्ध सायकल व बॅडमिनटन पटू श्री.पराग संधान साहेबांनी उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना खेळ हा व्यक्ती जीवनातील अविभाज्य घटक आहे.कोणत्याही खेळात मिळविलेले प्राविण्य आपले करियर घडवू शकते असे म्हंटले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करत असतांना मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी साहेबांनी सदर क्रिडा महोत्सवाच्या आयोजना बाबत कौतुक केले.विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यक्रमा बरोबरच खेळही खेळले पाहिजे जेणे करून बुद्धी विकास बरोबरच शारीरिक विकास देखिल तितकाच महत्वाचा असतो असे सांगितले.आजच्या आधुनिक युगात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्याचाच एक भाग म्हणून सिंगलयुज प्लास्टिक हा आहे. विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सांभाळून जर आपल्या घरातील व आपल्या घरा शेजारील रहिवाश्यांकडून अशा प्लास्टिक चे संकलन करून नगरपरिषदेच्या प्लास्टिक संकलन केंद्रावर जमा केल्यास प्रती किलो रु.पन्नास शालेय वस्तूंसाठी दिले जातील असे अवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आणि नगरपरिषद शिक्षण मंडळ कोपरगाव यांचे मार्फत करण्यात आले होते. सूत्र संचलन एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शिक्षिका बोराडे म्यॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्स्वीतते साठी एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक ,कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
