शहा येथील १३२ के.व्ही वीज उपकेंद्र कार्यान्वित नागरिकांनी मानले मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार…

Uncategorized

चासनळी, पोहेगाव,कोळपेवाडी हे ३३ के.व्ही वीज उपकेंद्र जोडणीसाठी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचा पाठपुरावा सुरू…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सुरेगाव, चासनळी येथील विद्युत उपकेंद्रावर पडणारा विजेचा भार कमी करण्यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी आमदार असताना शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता.सिन्नरचे तत्कालीन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या सहकार्याने आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून शहा (ता. सिन्नर) येथे नवीन १३२ के.व्ही. विद्युत उपकेंद्र मंजूर करून घेतले होते. सदर उपकेंद्र कार्यान्वित झाले असून, त्यामुळे पोहेगाव, सुरेगाव, चासनळी, कारवाडी, मंजूर, हंडेवाडी व परिसरातील विजेचा प्रश्न सुटन्यास मदत होणार आहे.
शहा येथील उच्चदाब १३२ के.व्ही केंद्रातून कोपरगाव मतदारसंघातील कोळपेवाडी,चासनळी आणि पोहेगाव या उपकेंद्रांचा विद्युत पुरवठा जलद गतीने चालू करण्यासाठी ३३ के.व्ही वाहिन्यांचे काम तातडीने सुरू करावे यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी मागणी केलेली असून लवकरच या कामाला गती मिळून हा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे.
१३२ के.व्ही उपकेंद्र पूर्णत्वास गेल्याबद्दल कोळपेवाडी,चासनळी,पोहेगाव या भागातील गावांमधील ग्रामस्थांनी स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले आहेत.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सुरेगाव, चासनळी येथे असलेल्या विद्युत उपकेंद्रावर विजेचा भार मोठ्या प्रमाणात वाढला होता.त्यामुळे पोहेगाव, सुरेगाव, चासनळी, कारवाडी, मंजूर, हंडेवाडी आदी भागातील घरगुती वीज ग्राहकांना आणि कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात सतत अडचणी येत होत्या.विजेची मागणी वाढत असताना महावितरण कंपनी मात्र ग्राहकांना पुरेशा दाबाने नियमित वीजपुरवठा करू शकत नव्हती. शिवाय, वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्यामुळे वीज ग्राहकांची मोठी गैरसोय होत होती. विजेअभावी कृषिपंपाद्वारे पिकांना पाणी देण्यात शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत होती. या परिसरातील विजेची समस्या सोडविण्यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी शासनाकडे हा प्रश्न लावून धरला होता.
सन २०१४ मध्ये राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर असताना मा.आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी पोहेगाव, सुरेगाव, चासनळी या भागातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला. याकामी त्यांना सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी साथ दिली. राजाभाऊ वाजे यांनी पुढाकार घेऊन शहा (ता. सिन्नर) येथे १३२ के.व्ही. विद्युत उपकेंद्रासाठी जवळपास १६ एकर जागा उपलब्ध करून दिली. शहा येथील १३२ के.व्ही. विद्युत उपकेंद्राचे काम आता पूर्ण झाले असून, हे उपकेंद्र नुकतेच कार्यान्वितदेखील झाले आहे. शहा येथे कार्यान्वित झालेल्या या १३२ के. व्ही. विद्युत उपकेंद्राला कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सुरेगाव, चासनळी विद्युत उपकेंद्र जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पोहेगाव, सुरेगाव, चासनळी उपकेंद्रांचा भार हलका होणार आहे. तसेच शहा येथील या विद्युत उपकेंद्रामुळे कोपरगाव तालुक्यातील कारवाडी, मंजूर, हंडेवाडीसह पोहेगाव, सुरेगाव, चासनळी आदी अनेक गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
स्नेहलताताई कोल्हे यांनी या भागातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्यामुळेच शहा येथील १३२ के.व्ही. विद्युत उपकेंद्र सुरू होऊन विजेचा प्रश्न सुटल्याबद्दल पोहेगाव, सुरेगाव, चासनळी, कारवाडी, मंजूर, हंडेवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *