

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी या ठिकाणी 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री सचिनराव चांदगुडे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री रामभाऊ पा. गाढे व डॉक्टर विकास जामदार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एन.जी. बारे सर होते.
"रोजच्या दैनंदिन जीवनातील छोट्या कृतींमधूनही आपण देश सेवा करू शकतो. तसेच देशाच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने शिक्षण घ्यावे व आपल्या पालकांच्या कष्टाचे सार्थक करावे"
असे मार्गदर्शन श्री सचिन चांदगुडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
" प्रजासत्ताक राज्य हे समाज केंद्री आहे, देशाचे संविधान घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे." असे प्रतिपादन श्री रामभाऊ पा. गाढे यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्री बारे सर यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या विकासामध्ये स्वयंशिस्तीचे महत्व पटवून सांगितले.
याप्रसंगी कु. गायत्री पारखे, कु. वैष्णवी बोडखे व कु. प्रीती सानप या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास श्री महेश आहेर, श्री कैलास माळी, श्री सुरेश चांदगुडे, श्री देवीदास कासोदे,श्री लतीफ सय्यद, श्री ललित चांदगुडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.बी. पवार व आभार प्रदर्शन प्रा. एस. पी. ढेकळे. यांनी केले.
