नगरपालिकेच्या शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
बेट भागात नगरपालिका शाळा नंबर 5 मध्ये नुकताच हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. निपुण भारत अभियान अंतर्गत पहिली ते तिसरीच्या माता पालकांचाही मेळावा यावेळी घेण्यात आला. यावेळी विद्यार्थी व माता पालकांना व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. माता पालकांनी आपल्या पाल्याच्या कृती घरी करून घ्यावयाच्या असतात. स्वतः माता पालकांसाठीही या कृती असतात. हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल व शिक्षणाबद्दल पालकांनी शिक्षकांशी संवाद साधला. माता पालकांना यावेळी वाण वाटण्यात आले. महिलांना आरोग्य विषयी माहिती सांगण्यात आली. महिलांच्या आरोग्य विषयी समस्यांबाबत उपाय सांगितले.महिलांसाठी उपयुक्त प्राणायाम व योगासने यांची प्रात्यक्षिक करून घेण्यात आली. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. यावेळीअर्चना वाघमारे, पूजा लांडे, अश्विनी रक्ताटे, पुनम कर्डिले, संजना खुरसणे, अनिता मोरे, सरला बर्डे, रत्ना ढाकणे, सीमा रक्ताटे,, रोहिणी गायकवाड, कावेरी शिंदे,पायल जोशी, सुवर्णा मतकर, शितल शितोळे, रेखा जपे, दीपिका परदेशी, उज्वला माळी, शारदा वाबळे, सुनंदा क्षीरसागर, भारती पंडोरे, पुनम गगे, शोभा कुलकर्णी,हे माता पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक विलास माळी, सुनील रहाणे, नसरीन इनामदार, व अमोल कडू यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *