कामगार सहकारी पतपेढी साकरवाडीच्या चेअरमन पदी सचिन टेके यांची बिनविरोध निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी-साकरवाडी येथील दि गोदावरी बायो रिफायणारीज लिमिटेड साकरवाडी येथील कामगार संघटनेच्या कामगार सहकारी पतपेढी या संस्थेच्या चेअरमन पदी सचिन दादासाहेब टेके यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली
भारतीय कामगार कर्मचारी संघ या संघटनेने संस्थेवर सलग दुसऱ्यांदा वर्चस्व स्थापन केल्याने या पॅनलचे नेतृत्व करणारे सचिन टेके पाटील यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच शिल्लक होती आज झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या विशेष सभेत सचिन टेके यांची चेअरमनपदी, निलेश गायकवाड यांची व्हा चेअरमन पदी तर अशोक गजभिव यांची सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली


यावेळी गोदावरी बायो रिफायणारीज च्या सर्व कामगार व अधिकारी तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आभार मानले यावेळी बोलताना मिळालेल्या संधीचे सोने करून कामगारांच्या हिताचे निर्णय घेऊन यापुढेही संस्था व संघटनेच्या माध्यमातून कामगारांसाठी चांगले काम करुन दाखविणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित चेअरमन सचिन टेके यांनी व्यक्त केला
यावेळी सदस्य राहुल कोकाटे, वसंतराव वारकर,अशोक गजभिव,बाबुराव मारकळी, विजय गोंदकर ,मिलिंद हिवराळे महेश वालझडे आदी सदस्य उपस्थित होते
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन मा ठोंबळ साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्री राहानेसाहेब यांनी काम पाहिले
नुतन पदाधिकारी यांचे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष मिलिंदजी तुळस्कर ,सरचिटणीस सुहासजी माटे, उपाध्यक्ष प्रशांतजी वर्तक ,विनोद गोगळे या मुंबईतील कामगार नेत्यांसह वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे, गोदावरी बायो रिफायणरी ज लि साकरवाडीचे डायरेक्टर सुहास गोडगेसाहेब , माजी सभापती मच्छिद्र टेके माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे,माजी सरपंच रावसाहेब टेके, उपसरपंच विशाल गोर्डे,अध्यक्ष नारायण वाळुंज सरचिटणीस सुनिल महाले उपाध्यक्ष गौतम मोरे,मधुकर गायकवाड,शेखनुर शेख ,विलास दाभाडे, अनिल निकम, अनिल सिंग, दत्ता शेलार, भगवान हुसळे, मधुकर मोरे, संतोष जगताप, राजपालसिग राजपुत,दादासाहेब वरकड, आर डी सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *