

कोपरगाव प्रतिनिधी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व अहमदनगर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा नुकत्याच सहयाद्री ज्युनियर कॉलेज, संगमनेर येथे पार पडल्या या स्पर्धेत सोमैया विद्यामंदिर साकरवाडी शाळेने सहा पैकी पाच गटात निर्विवाद वर्चस्व कायम राखले
सोमैय्या विद्यामंदिर साकरवाडीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत या स्पर्धेत तब्बल सहा पैकी पाच गटात अजिंक्यपद पटकाविले आहे ही विशेष बाब आहे
चौदा वर्षाखालील मुली झालटे प्रियांशी , मोरे साक्षी, वाघ अनुष्का,शिरसाठ तन्वी, हिवरे तनुजा सतरा वर्षाखालील अजिंक्यपद पटकावणाऱ्या मुली देवरे प्राची, भदाणे जान्हवी, माने संजना,देशमुख मनीषा, मुकिंद समीक्षा
एकोणीस वर्षाखालील मुली अजिंक्यपद प्रसाद मयुरी, प्रसाद मनीषा,मोरे साधना, जाधव श्रेया,भडांगे वैशाली
चौदा वर्षाखालील अजिंक्यपद मिळविणारे मुले देवरे आदित्य, पवार निखील जाधव सोहम, बागूल आयुष, आहेर अभंग तसेच एकोणीस वर्षांखालील मुले अजिंक्यपद पाटील साई, मैंद यशराज,ओहोळ साहिल,चौधरी गौरव,काथे तन्मय
सोमैय्या शाळेच्या मुलींनी तर सलग १२ व्या वर्षी आपले वर्चस्व या स्पर्धेत कायम राखले

सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष उद्योजक आदरणीय समीरभाई सोमैय्या संस्थेचे सचिव सुहासजी गोडगे, प्राचार्य सौ. सुनीता पारे यांचे विशेष सहकार्य लाभले.तर क्रीडाशिक्षक संजय अमोलिकसर यांचे मार्गदर्शन लाभले.पुणे विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या सहा संघांपैकी पाच संघ एकट्या सोमैया विद्यामंदिर, साकरवाडीचे आहेत.विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू ग्रामीण भागातील असुन कामगार शेतकरी शेतमजूर कुटुंबातील आहेत त्यांच्या या यशामुळे सर्व खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे
