
कोपरगाव प्रतिनिधी:-
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, जेष्ठ ,श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व आणि राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननिय,आदरणीय,सन्माननीय श्री.भगवानरावजी बिडवे (आण्णा )
तसेच राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे सर्व सन्मानित मान्यवर पदाधिकारी आणि सर्वच सदस्य, हितचिंतक सर्वाना नमस्कार



मी किर्ती घनश्याम जाधव, निकम तुम्हा सर्वांच्या ऋणानुभारात कायम असेन
मला नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून दिलेली ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन हे शिवधनुष्य पेलण्याच सामर्थ्य माझ्यात आहे हा विश्वास आदरणीय आण्णा आणि सोलापूरचे सन्माननीय पदाधिकारी श्री मल्लिनाथजी चौधरी यांनी दर्शविला तो सार्थ ठरविण्यासाठीची मेहनत, कर्तव्य माझ्याकडून श्री संत सेना महाराज आणि सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा करूवुन घेतीलच. तसेच सर्व मान्यवर पदाधिकारी मला समजून घेतील अशी आशा व्यक्त करते
आणि सर्वांच्या सदीच्छांचा मनःपूर्वक स्वीकार करून पुढील कार्यास लवकरच सुरवात करते.
किर्ती घनश्याम जाधव निकम
नाशिक जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ.
