
कोपरगाव प्रतिनिधी:-
बाळ केशव ठाकरे यांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार ते शिवसेनाप्रमुख असा प्रवास करणार्या बाळ ठाकरेंना कोणतीही सक्रिय राजकारणाची पार्श्वभूमी नव्हती. वडीलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर आपला करिष्मा तयार केला. बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील मराठी भाषिक लोकांना संघटित करण्यासाठी संयुक्त मराठी चळवळ मध्ये प्रमुख भूमिका बजावली. यंदा त्यांची दहावी पुण्यतिथी आहे. १७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी वृद्धापकाळाने त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला होता. आज कोपरगाव शिवसेना(उद्धव ठाकरे गट) यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदर दडीयाल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार शिवसैनिकांना नेहमीच प्रेरणा देत राहतील व त्यांना अपेक्षित होते असे काम सदैव आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेनेशी व उद्धव साहेबांशी एकनिष्ठ राहून घराघरात शिवसेनेचे विचार पोहचवण्याचे काम करत राहू असे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले. या वेळी शहरप्रमुख कलविंदर दडीयाल,टेकचंद खूबानी, ज्येष्ठ शिवसैनिक मकरंद जोशी,कुक्कुशेठ सहानी,युवासेना सहसचिव सुनील तिवारी,किरण बिडवे,बाळासाहेब जाधव,दिलीप अरगडे,किरण भोईर,दिलीप सोनवणे,किरण खर्डे,शंकर यादव,इरफान शेख,अरुण बोराडे,संतोष झावरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वर्पे,सुनील गांगुले,वाल्मिक लहिरे,मंदार पहाडे,विरेन बोरावके,दिनार कुदळे,फकीर कुरेशी,रमेश गवळी,मनसेचे सुनील फंड,संतोष गंगवाल,माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे,शिवसेना महिला आघाडीच्या अश्विनी होणे, शितल चव्हाण,कोपरगाव शिवसेना सचिव बाळासाहेब साळुंके, प्रवक्ते राहुल देशपांडे,उपशहरप्रमुख शेखर कोलते,प्रफुल्ल शिंगाडे,विकास शर्मा,सुनील कुंढारे,किरण अडांगळे,मयुर दळवी, योगेश उशीर,संघटक वैभव गिते,दिपक बरदे, अक्षय वाकचौरे,वसीम शेख,अशोक पवार, प्रवीण शेलार,विभागप्रमुख मधू पवार,सतीश शिंगाणे,मयुर शिवदे,सतीश खर्डे,दिपक चौधरी, गणेश थोरात, सार्थक चव्हाण,जाफर पठाण,गौरव गुप्ता,अमजद शेख, पप्पू पेखळे, किरण कुऱ्र्हे, अविनाश धोक्रट, अविनाश वाघ,अंबादास वाघ,रोशन पवार,दत्तात्रय झावरे,श्रीपाद भसाळे,निखिल दिवटे,उमेश छुगानी,आकाश कर्डिले,चंद्रहंस पाबळे, सतीश लोळगे, अक्षय नन्नावरे,रवी पवार,ओम साळुंके,वेदांत कर्पे,अजय दिवटे,विशाल झावरे,सचिन मोरे,प्रवीण शिंदे,करण दळवी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
