वारीत महाश्रमदानातून परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह ३४ वा” उत्साहात संपन्न…!

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वारी, जय बाबाजी भक्त परिवार, वारी व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे अमृत महोत्सवीवर्षानिमित्त रविवार (दि. ६ नोव्हेंबर २०२२ ) सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह ३४ वा” यशस्वीपणे राबविण्यात आला.
या अभियानात वारीतील ग्रामपंचायत कार्यालय परिसर, श्री.रामेश्वर मंदिर, मारुती मंदिर, लहान देवी मंदिर, मज्जिद परिसर तसेच रामेश्वर गल्लीतील रस्ता परिसरातील काटेरी झुडुपा तोडून पेटवून देत स्वच्छता करण्यात आली.
या अभियानात सरपंच सतिशराव कानडे, सामाजिक कार्यकर्ते मधुकरराव टेके, सेतू कार्यालयाचे संचालक रवींद्र टेके, सेवानिवृत्त अधिकारी रावसाहेब जगताप साहेब,लोकमतचे उपसंपादक रोहित टेके, वारी पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर संजय कवाडे, सांडूभाई शेख, लालाभाई पठाण, ताबिज शेख, ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, मनोज जगधने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या या अभियानात आपले श्रमरुपी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *