श्रीक्षेत्र चासनळी ते देहू पायी दिंडीचे आयोजन…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:- सालाबादप्रमाणे याही वर्षी आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली संजीवनी समाधी सोहळयानिमीत्त तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ते देहु पायी दिंडीचे आयोजन करण्यांत आले असल्याची माहिती हभप बाबूराव महाराज चांदगुडे यांनी दिली.
सदरची दिंडी ८ नोव्हेंबर रोजी चासनळी येथुन प्रस्थान करणार आहे. तर २१ नोव्हेंबर रोजी देहु येथे मुक्कामी पोहोचेल या चौदा दिवसांच्या काळात पायी दिंडी दरकोस दरमजल मुक्कामी राहुन या काळात भजन, किर्तन, अखंड नामस्करण, समाज संस्कार, स्वच्छतेचे प्रबोधन, हुंडामुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, भूमिपुर्यावरणीय -हासाच्या उच्चाटनांसाठी वृक्षारोपण काळाची गरज इत्यादीबाबत गांवोगांवी प्रबोधन करून ज्ञानेश्वर माउलींचे आचार विचार मार्गदर्शन केले जात असल्याचे शेवटी ह. भ. प. बाबूराव महाराज चांदगुडे यांनी सांगितले. सदरच्या पायी दिंडी सोहळयासाठी असंख्य समाज दार्तृत्वानांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यांत आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *