क्षत्रिय समाज फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; उपाध्यक्ष विनोद सिंग यांचा वाढदिवस आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत साजरा…

Uncategorized

विनोद सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगसह फळांचे वाटप…

विद्यार्थ्यांना स्कूलबॅगसह फळांचे वाटप करत क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनोद सिंग यांचा वाढदिवस साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):- नाशिकच्या क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनोद सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅग फळे तसेच शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नाशिकच्या क्षत्रिय समाज फाऊंडेशनच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात येतात. कुठलेही विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जातो. संस्थेचे विविध उपक्रम हे शालेय विद्यार्थ्यांसमवेत साजरे केले जातात. तसेच फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस हा विद्यार्थ्यांसमवेत साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनोद सिंह यांचा वाढदिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅग फळे तसेच शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी मुलांच्या पालकांनी क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.
यावेळी रामसिंह राजपूत, महेंद्रसिंग राजपूत, गिरवरसिंग राठोड, अरविंदसिंग शेखावत, प्रेमसिंग राठोड, अनिल कौशिक, बजरंगसिंग शेखावत, तेजपालसिंग सोढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *