

कोपरगाव प्रतिनिधी
(धुळे):-
धुळे-९ आक्टोबर रोजी शिवरक्षक जिवाजी महाले यांची ३८७ वी जयंती होती अखिल भारतीय जिवा सेनेच्या वतीने या वर्षी जयंती सप्ताह साजरा करण्यात आला.
अखिल भारतीय जिवा सेना धुळे शहर तर्फे भव्य मोटार सायकल रँलीचे आयोजन केले होते.


छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, केशव गार्डन,जुना आग्रा रोड मार्गे श्री संतसेना नगर पर्यत भव्य मोटार सायकल रँलीचा मार्ग होता. शिवरक्षक जिवाजी महाले यांची प्रतिमा ही शुशोभीत रथावर विराजमान होती.प्रतिमेस खास शिर्डी येथील बनावटीचा गुलाबांचा हार लावण्यात आला होता.रँलीच्या च्या सुरवातीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास नाभिक महिला मंडळाच्या अध्यक्षा त्रिवेणीताई सोनवणे व मनिषाताई चित्ते यांच्या शु़भहस्ते माल्यार्पण करण्यात आले,रथावरिल जिवाजी महाले प्रतिमेचे पुजन अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले यांनी केले, मोटरसायकल रँलीचे उद्घघाटन नगरसेविका सुमनताई वाघ व धुळे शहर नाभिक समाजाचे अध्यक्ष विलासतात्या सैंदाणे यांनी भगवा झेंडा फडकवत रँलीची सुरवात केली.लीत महिलांनी भगवी साडी,भगवा फेटा गळ्यात भगवी पट्टी, तर पुरूषानी पाढरा कुर्ता शर्ट व भगवा फेटा असा पेहराव परिधान केला होता,महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.



मोटर सायकलीवर महिलांनी भगवे झेंडे फडकवत जय शिवाजी जय जिवाजी घोषणा देत सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले होते.महिला पुरूषांनी मरा़ठी पोवाडे व धार्मिक गीतावर ढोल लेझीमच्या धव्नीवर जोरदार ठेका धरला रँलीतील जल्लोष पहाता अनेकांनी मोबाईल मध्ये चित्रफित करत होते. हा मोहन आवरला गेलाच नाही.शिवजयंती स्वरूप वातावरण निर्मिती झाल्याचे जानवत होते.”होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी”. ही उक्ती सार्थ करनारे छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत शुर मावळे यांची जयंतीचा उत्साह जल्लोष युवकांमध्ये जोमाने संचरला होता.गांधी पुतळा चौक दत्तमंदिर चौकात फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.शिवनेरी शैक्षणिक व सास्क़ृतीक मंडळाच्या वतीने देवपुर चौकात प्रतिमा पुजन व रँलीचे स्वागत केले व थंडपेय पण वाटण्यात आले यांचे आयोजन नगरसेवक सुनिल सोनार,अविनाश अहिरराव अमोल मोरे,हर्षल सैंदाणे आदी युवकांनी केले होते.अप्रतिम नियोजनात्मक मार्गक्रमण करत रँली स्वागत लाँज यशोदा हाऊस्पीटल समोरील रस्त्याकडुन वळली संतसेना नगर कडे जाणारा रस्त्याच्या वळणावरच कोपर्यावर शिवरक्षक जिवाजी महाले मार्ग या फलक दिमाखदार थाटात उभा होता.या फलकाचे नामकरण आज जयंती दिनी होते.
शिवरक्षक जिवाजी महाले मार्गाचे नामकरणांची मागणी अखिल भारतीय जिवा सेनेची अनेक वर्षापासुन होती.धुळे मनपाचे विद्यमान महापौर प्रदिपजी कर्पे यांनी ही मांगणी मनपा महासभेत त्यांच्या कार्यकाळात पुर्ण केली.फलकाचे उद्घाटन उपमहापौर अनिल नागमोते,नगरसेविका सुमनताई वाघ,नगरसेवक सुनिल सोनार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रमु़ख अतिथी म्हणुन प्रसिध्द विधीतज्ञ कुंदनजी पवार,आदीवासीचे कैवारी युवानेते योगेश महाले,मा.नगरसेवक उमेश महाले,जिल्हा सचिव सुभाष शिरसाठ,आयकर अधिकारी नरेद्र खोंडे; अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले,महिला प्रदेश अध्यक्षा मिनाक्षी भदाणे,प्रदेश उपाध्यक्ष भगवान चित्ते,प्रदेश संघटक सुधीर महाले, युवकांचे प्रदेश अध्यक्ष देविदास फुलपगारे,युवक प्रदेश सरचिटणीस प्रा.नरेंद्र महाले,सर,उत्तर महाराष्ट्रांचे कार्याध्यक्ष गणेशभाऊ ठाकरे,ओंकार ईशी,योगेश ईशी,उ. म.महिला संपर्क प्रमु़ख रंजना सुर्यवंशी,जिल्हा संपर्क प्रमुख तुषार सैंदाणे,शंकर सैंदाणे,ज्ञानेश्वर सोनवणे,मनोज ठाकरे,मनोज सैंदाणे,सतिष पवार,दुकानदार संघटनेचे मा. अध्यक्ष अमृत महाले,अध्यक्ष नाना वारूडे,लक्ष्मण बोरसे,प्रदिप भदाणे,कैलास याळीस,शशी सैंदाणे,गोपाल चित्ते,संदिप निकम,योगेश सैंदाणे,भिकन सैंदाणे, सुनिल सैंदाणे, संतसेना सोसा चेअरमन बापु सैंदाणे,नाभिक समाजाचे नेते शाम खोंडे,देवेद्र सुर्वे,हिरालाल ठाकरे,पप्पू वाघ,आँल इंडीया सेन समाज संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष भरत शिरसाठ ,उपाध्यक्ष युवराज सैंदाणे,नंदुरबार जिल्हा ना़भिक समाजाच्या अध्यक्षा जयश्री निकम,सचिव मनिषा निकम,अनिता वाघ ,रेखा महाले,छाया महाले,ज्योती महाले,भावना सोनवणे,गीता खोंडे,वंदना पगारे,कल्याणी ठाकरे,पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होती. कार्यक्रमांचे आमत्रंण सोशल मिडीयावरून देण्यात आले होते पत्रिका विरहीत निमंत्रण स्विकारून बहुसंख्य समाजप्रेमी बंधू भगीनी,जिवाजी भक्त,यांनी आवर्जुन उपस्थिती दिली.रँलीचे विसर्जन व शिवरक्षक जिवाजी महाले यांची पुजन श्री.संतसेना नगर मंगल कार्यालयात करण्यात आले,व्यासपीठावरील मान्यवर व झटनारे व देणगीदीर सर्व पदाधिकारी यांचा सर्वांचा सत्कार सभारंभ सुध्दा नकरता सर्वांचा शब्द सुमनांनी व टाळाच्या गजरातच सत्कार सन्मान साजरा केला व वेळही वाचवला,सकाळी नास्ता व दुपारी भंडाराचे सुध्दा आयोजन केले होते,व्यासपीठावरील मान्यवर प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले यांनी प्रास्ताविक सादर केले,युवकांनी संघटीत होऊन नाभिक समाजाचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मनोगते ही झाली अँड कुंदनजी पवार यांनी शुरवीर जिवाजी महाले यांचा प्रतापगडावरील रोमांचक थराररक इतिहास सांगीतलाव शिवरक्षक जिवाजी महाले यांचे योगदान स्वराज्य उभारणीत होतं ही नाभिक समाजासाठी अभिमानाची बाब आहे,छत्रपती शिवरायांनी जिवाजींना घोडा व पालखीचा मान देऊन सन्मानीत केले होते यावरूनच कळते की जिवाजी महाले किती पराक्रमी व महान होते,युवकांनी शरीरयष्टी कडे लक्ष द्यावे व व्यसनाच्या भस्मासुरापासुन लांब रहावे,व शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधुन स्वत व समाजाला मोठे करावे असे सांगीतले,.
महिला प्रदेश अध्यक्षा मिनाक्षी भदाणे यांनी महिलासाठी व्यासपीठ तयार असुन या व्यासपीठावरून समाजाला प्रगती पथावर न्यावे अखिल भारतीय जिवा सेना जशी माझ्या पाठीमागे खंबीर उभी राहिली तशी तुमच्या मागे ही खंबीर उभी राहिल व आपण सर्वांनी समाज संघटनात सहभाग घ्यावा.असे आवाहन केले,
युवा नेते यांनी मनोगतात सांगीतले की विखुरलेल्या समाजाची कुणीही राजकिय पक्ष दखल घेत नसतो म्हणुन समाजाने गटातटात न रहाता समाजहितासाठी एकत्रित व्हावे असे सांगीतले. महिला जिल्हाअध्यक्षा त्रिवेणी सोनवणे यांनी संघटनेचे कार्य शानदार आहे,कोरोना काळात जिव धोक्यात घालुन या कार्यकर्त्यानी घरपोच किराणा दिला व गरजु समाज बांधवाना मदत केली ही संकल्पना महाराष्ट्रतुन सर्वप्रथम अखिल भारतीय जिवा सेनेने उभी केली, समाजावर होनारे अन्यावर वाचा फोडण्याची हिम्मत जिवा सेनेचे शिलेदार करतात,रक्तदान,समाजातील रूग्णांना मदत,महापुरूषांच्या जयंती,स्मृतीदिन,शैक्षणिक,विद्यार्थ्याचे कौतुक कार्यक्रम,गरजुना वह्यावाटप,जैष़्ठांना मान सन्मान,कानबाई उत्सवात दरवर्षी पाणी वाटप,महिलांना सदैव प्रबोधन,विविध स्पर्धांचे आयोजन,कोटूबींक वादविवाद संवादाने सोडविणे,युवा युवतीचे लग्न जुळविणे,असे असख्य उपक्रम अखिल भारतीय जिवा सेना ही करत आली आहे. आपल्या नंदुरबार धुळे येथुन महाराष्ट्राचं नैतृत्व दिनेश महाले,भगवान चित्ते,सुधीर महाले,मिनाक्षी भदाणे,नंदुरबार देविदास फुलपगारे,जळगाव गणेश ठाकरे,आदी करताना पाहुन अभिमान वाटतो असे सांगीतले.
याकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर महाले,भगवान चित्ते,गणेश ठाकरे,राहुल सुर्यवंशी,ज्ञानेश्वर सोनवणे,सतिष पवार,योगेश खराडे,चिंतामण शिरसाठ ,जगदिश अहिरराव,सुनिल अहिरराव,किशोर वाघ,तुषार सैंदाणे,अमृत महाले,मनोज ठाकरे,मनोज सैंदाणे,लक्ष्मण बोरसे,नाना वारूडे,संजय सैंदाणे,संदिप निकम,गोपाल चित्ते,छोटू सोनवणे,कुंदन महाले,राहुल महाले,भुषण पगारे,भय्या महाले,ईश्वर सैंदाणे,पंकज ठाकरे,कुणाल महाले,राहुल खोंडे,गजानन भदाणे,भय्या याळसे,गुलाब सैदाणे,किशोर सोनवणे,गिरीष महाले,योगेश सैंदाणे,प्रमेश चित्ते,भय्या वारूडे,आदी़चे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सुत्र संचलन गणेश ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष राहुल सुर्यवंशी यांनी केले,
दिनेशभाऊ महाले,धुळे 9423062999 ,,8999360034
